शेतकऱ्यांच्या एल्गार कर्जमुक्तीसाठी अर्जासह शेतकरी तहसील कार्यालयावर धडकले

HomeNewsनागपुर डिवीजन

शेतकऱ्यांच्या एल्गार कर्जमुक्तीसाठी अर्जासह शेतकरी तहसील कार्यालयावर धडकले

गौतम नगरी चौफेर //संजीव भांबोरे भंडारा – जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीच्या कामासाठी बँकेकडून कर्ज घेतले पण दुष्काळ व नापिकी तसेच उत्पादनात घट या कारणामुळे कर्जाची किस्त भरण्यासाठी पैसे आणायचे कुठून असा प्रश्न शेतकऱ्यांना  पडला आहे .हातात पैसे नसल्यामुळे कर्ज कसा भरावा? या योजनेत शेतकरी असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन किसान ब्रिगेडतर्फे साकोली तालुका प्रतिनिधी डी जी रंगारी यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयात देण्यात आले . व तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले.

भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्ज माफीसाठी शेतकरी नेते व किसान ब्रिगेडचे संस्थापक प्रकाश पोहरे यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती साठी उपक्रम राबविण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी रब्बी व खरीप हंगामातील कृषी कार्य करण्यासाठी तसेच रासायनिक खत खरेदी करण्याकरिता विविध बँकेकडून कर्ज घेतले पण पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन झाले नाही .उत्पादनात कमालीची घट यावर्षी आणला आहे. अशातच निसर्गाच्या लहरीपणामुळे सुद्धा शेतातील पिकांचे नुकसान झाले .कुठे दुष्काळ तर कुठे अतिवृष्टीमुळे सुद्धा शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादनात चांगला होईल असे आशेवर बँकेकडून कर्ज घेतले पण दुष्काळामुळे झालेली नापिकी तसेच वातावरणाच्या लहरीपणामुळे अतिवृष्टी काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी गारपीट झाल्याच्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे अशा त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बँकेकडून घेतलेल्या कर्जात एक कीस्त भरायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे एकीकडे दुष्काळ व नापीके मुळे उत्पादनात झालेली घट तसेच दुसरीकडे बँकेचे कर्ज कसे फेडायचे अशी दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे काही शेतकऱ्यांनी तर कृषी कार्यासाठी बँकेतून घेतलेच आहे पण सावकाराकडून सुद्धा कर्ज घेतले आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचे डोंगर वाढत चालले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढली आहे असून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन शेतकऱ्यांकडून सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी यांच्याकडून तहसीलदाराला देण्यात आले तहसीलदारा मार्फत  मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले याप्रसंगी सुरेश गोटेफोडे, योगेश मडावी, आनंदराव टेकाम, भारत लांजेवार, पराग लांजेवार, व इतर शेतकरी प्रामुख्याने निवेदन देताना उपस्थित होते.

COMMENTS

You cannot copy content of this page