गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी राजुरा) – जिवती पाटण जवळील कलगुडी येथे नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा दिपोत्सव कार्यक्रम संपन्न.
राजुरा 29 ऑक्टोबर नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा दिपोत्सव कार्यक्रम नुकताच जिवती पहाडावरील पाटण जवळ असलेल्या अतिदुर्गम अश्या कलगुडी येथील कोलाम आदिवासी समुदयासोबत संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मिलिंद गड्डमवार यांची उपस्थिती होती. तमसोमां ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे जात मानवाला मानवाशी जोडणारा हा दिपोत्सव उपक्रम असून यात संस्थेच्या व इतरही लोकांनी सहभाग घेऊन एक नवा आदर्श तयार केला असे प्रतिपादन यावेळी गड्डमवार यांनी केले. कार्यक्रमात सत्कारमूर्ती म्हणून जिवती तालुक्यातील पालडोह या जिल्हा परिषद शाळेतील वर्षातुन तीनशे पासष्ट दिवस शाळा सुरू ठेवून शिक्षण देणारे उपक्रमशील प्रभारी मुख्याध्यापक राजेंद्र परतेकी यांचा व महाराष्ट्र शासनाने नुकताच जाहीर केलेला कृषी भूषण पुरस्कार प्राप्त केलेल्या राजुरा येथील महीला विमलदेवी वाघुजी गेडाम यांची उपस्थिती होती. सत्कारमूर्तीनां शॉल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, पर्यावरण विशेषांक पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणुन नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, वाघूजी गेडाम, आदिवासी सेवक, विजयकुमार जांभूळकर,नागपुर विभाग अध्यक्ष, रजनी शर्मा, नागपूर विभाग महीला अध्यक्षा, कला सांस्कृतिक विकास समिती, मोहनदास मेश्राम, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष, अनंत डोंगे, राजुरा तालुका अध्यक्ष, नरेंद्र देशकर, जिल्हा उपाध्यक्ष, कृतीका सोनटक्के, महीला तालुका अध्यक्षा, कला साहित्य समिती, बबलू चव्हाण, युवा राज्याध्यक्ष, शंकर बूर्हान, उषा टोंगे, कोरपना तालुका महिला अध्यक्षा, भास्कर फरकाडे, तालुका सचिव बल्लारपूर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागपूर विभाग युवती अध्यक्ष स्वाती मेश्राम यांनी केले. प्रास्ताविक रजनी शर्मा यांनी तर आभार मोहनदास मेश्राम यांनी मानले. यापूर्वी नेफडो संस्थेमार्फत जिवती तालुक्यातील घोडनकप्पी, खडकी, रायपूर, व राजुरा तालुक्यांतील बगलवाही, बापूनगर, जंगुगुडा येथे दिपोत्सव कार्यक्रम घेण्यात आला. दरवर्षी दिवाळी पूर्वी हा उपक्रम घेण्यात येतो. यामधे येथील कोलाम आदिवासींच्या संपुर्ण परिवाराला ब्लेंकेट, कपडे, फराळ चकली, चिवडा, लाडू साहित्य, शैक्षणिक साहित्य पेन, पेन्सिल, खोटरबर, शोपणर, परीक्षा खरडा, पुस्तकं आदींचा समावेश असतो.
यापूर्वी क्रिडा साहित्य, डेटॉल साबण, सेनेटरी नॅपकीन, बूक – पुस्तकं, मच्यरदाणी अशा साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी महसूल विभाग, पोलिस विभाग यांच्या निर्देशाप्रमाने रीतसर परवानगी घेऊन हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या पदाधिकारी,संघटक,सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले.
COMMENTS