आदिवासी टायगर सेना जिल्हा अध्यक्ष ह्यांचा अनोखा उपक्रम.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजूरा तालुका प्रतिनिधी
देशाचे रक्षण करणारे व आदिवासी समाजाचे नेतृत्व करणारे माजी सैनिक ड्रेफुल आत्राम ह्यांचा दिनांक २२ ऑगस्ट रोजी वाढदिवस त्यांनी अन्याय ग्रस्त लोकांना भेट देऊन साजरा केला. आदिवासी टायगर सेना जिल्हा अध्यक्ष मनून ते सद्या आदिवासी समाजाची सेवा करत आहेत. त्यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्हात अनेक आंदोलने व सामाजिक विषयाला धरून विविध मुद्द्यावर सरकार दरबारी पाठपुरावा करण्यात आला, त्यात अनेक प्रकरणे मार्गी लागली आहेत.
राष्ट्रीय कार्याध्यक्ष आमदार प्रा. राजू भाऊ तोडसाम, माजी आमदार दीपक दादा आत्राम व विदर्भ अध्यक्ष संतोष कुलमेथे, नीता तलांडी, डॉ.सोनल कोवे , इंजी. अभिलाष परचाके ,प्रियांका मडावी ह्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना. विदर्भात आदिवासी टायगर सेने मार्फत अनेक लोकहिताचे कामे करण्यात आली.
सिरशी(बेरडी) ह्या गावात पेसा कायदा अस्तित्वात असून त्या गावात तेंदू पत्ता संकलन करण्याचे कंत्राट ग्राम पंचायत मार्फत कंत्राटदाराला देण्यात आले होते त्याचा मोबदला अजूनही गावकऱ्यांना मिळाला नाही. त्यात पावसाने त्यांचे पीक नष्ट झाले.त्यांचा पोळा हा दुःखात जाणार ह्याची माहिती ड्रेफुल आत्राम ह्यांना कळताच त्यांनी आपला वाढदिवस जनतेला भेटी देऊन व त्यांचे दुःख समजून घेऊन साजरा करण्याचे ठरविले. आपल्या राहत्या घरापासून ५० किमी अंतरावर असलेल्या शिरशी गावात जाऊन भेट देऊन समस्या सोडवण्याचे प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
शिरशी गावात जाऊन त्यांनी समस्या जाणून घेतल्या. व त्यांनी गावातील नागरिकांन ना फळ वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला. त्या वेळी गावातील महिलांनी पारंपारिक पद्धतीने त्यांना औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्या वेळी आदिवासी टायगर सेना चे विदर्भ अध्यक्ष संतोष कुळमेथे, विदर्भ युवा अध्यक्ष अभिलाष परचाके, विदर्भ प्रसिद्धी प्रमुख आकाश गेडाम,तालुका अध्यक्ष भद्रावती आकाश तोडासे. तालुका संघटक राजुरा नट्टू खंडाते, सामाजिक कार्यकर्ते तथा कंत्राटदार कालिदास नगराळे सह सर्व गावातील नागरिक उपस्थित होते.


COMMENTS