गौतम नगरी चौफेर //गडचांदूर//: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मागील काही महिन्यांपासून जबाबदाऱ्यांवरून सुरू असलेली रस्सीखेच अखेर थंडावली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी सायंकाळी जारी केलेल्या पत्रकानुसार चंद्रपूर महानगरची निवडणूक जबाबदारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. ग्रामीण भागाची कमान आमदार देवराव भोंगळे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तसेच चंद्रपूर जिल्हा प्रभारी म्हणून गडचिरोलीचे माजी खासदार अशोक नेते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दोन महिन्यांपूर्वीच पालकमंत्री बो डॉ. अशोक ऊईके यांनी महापालिका निवडणूक जोरगेवार यांच्या मार्गदर्शनात राहील, असे सार्वजनिक संकेत दिले होते. आता प्रदेशाध्यक्षांच्या पत्रकाने त्यास अधिकृत स्वरूप मिळाले किशोर जोरगेवार देवराव भोंगळे आहे. जोरगेवार यांच्याकडे चंद्रपूर महानगरासोबतच घुग्घुस नगर परिषद आणि दोन जिल्हा परिषद मतदारसंघाची जबाबदारी आहे. दुसरीकडे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या गटातील आमदार देवराव भोंगळे यांच्यावर ग्रामीण भागाचे मोठे ओझे ठेवण्यात आले आहे. घुग्घुस वगळता नऊ नगरपालिकांसह एक नगरपंचायत असा मोठा भूभाग त्यांच्या नियंत्रणात येत आहे.
संघटनात्मक संतुलन राखण्यासाठी भाजप प्रदेश नेतृत्वाने अध्यक्षपदाच्या पातळीवरही समतोल साधला होता. सर्वाधिक पसंती मिळूनही राहुल पावडे यांच्याकडे महानगराध्यक्ष पद न देता सुभाष कासनगोडूवार यांची नियुक्ती करण्यात आली. तर ग्रामीण अध्यक्षपदाची धुरा हरीश शर्मा यांना देण्यात आली. त्याचवेळी महानगर निवडणूक जोरगेवार यांच्या हातात राहणार हे स्पष्ट झाले होते. आता फक्त अधिकृत शिक्कामोर्तब झाले. चंद्रपूर भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार हे सध्या बिहार निवडणुकीत तळ ठोकून आहेत. बेतिया मतदारसंघात ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.



COMMENTS