गौतम नगरी चौफेर (हर्षवर्धन देशभ्रतार भडांरा) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची 151 वी जयंती सामाजिक न्याय दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे प्रामुख्याने उपस्थित होते, त्याप्रसंगी आमदार साहेबांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, आमदार साहेब यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात केले. त्यावेळी आमदार साहेब म्हणाले लोकराजा, छत्रपती शाहू महाराजांनी बहुजनांच्या उन्नतीसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं. उपेक्षित, वंचित घटकांना मानसिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी पुरोगामी, क्रांतिकारक विचार समाजात रुजवण्याचं काम त्यांनी केलं. शिक्षण हेच खरं मुक्तीचं साधन आहे, या विचारातून त्यांनी समाजातील दुर्बल घटकांसाठी क्रांतिकारी योजना राबवल्या. स्त्रीशिक्षणासाठी आग्रही छत्रपती शाहू महाराजांनी मोफत सक्तीच्या शिक्षणाचा कायदा आणला. जातीभेद व अंधश्रद्धा निर्मुलन, अस्पृश्यता निवारणाचं अमूल्य काम त्यांनी केलं. विकासाची दूरदृष्टी बाळगणारे लोककल्याणकारी राजे, छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याला व स्मृतींना वंदन!उपस्थित मान्यवर…. श्री.मा.नरेंद्र भोंडेकर आमदार साहेब श्री. संजय कोलते जिल्हाधिकारी भंडारा श्री.देवसुदन धारगावे जिल्हा जात प्रमाणपत्र समिती सदस्य श्री.विजय आकरे जिल्हा जात प्रमाणपत्र समिती अध्यक्ष कोल्हे मॅडम.जिल्हा समाज कल्याण अधिकारी भंडारा शितल ताई राऊत-सभापती समाज कल्याण समिती.जी.प. भंडारा सेलजा ताई वाघ-जिल्हा माहिती अधिकारी भंडारा आशाताई कवाडे-सहाय्यक आयुक्त समाज कल्याण भंडारा अंजली चिवंडे-संशोधक अधिकारी इतर कर्मचारी उपस्थित होते.





COMMENTS