गौतम नगरी चौफेर //गौतम धोटे // आषाढ पौर्णिमेला पाली भाषेत आसाळहो म्हणतात. ही पौर्णिमा साधारणतः जुलै महिन्यात येते. भगवान बुद्धाच्या जीवनात या पौर्णिमेला काही घटना घडल्यात. जसे…
१. महामायेची गर्भधारणा
२. गौतमाचे महाभिनिष्क्रमण
३. प्रथम धम्मचक्कपवत्तन
४. वर्षावास

१. महामायेची गर्भधारणा
आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव शाक्य लोक उत्साहाने साजरी करण्याची प्रथा होती. हा उत्साह महामायेनी मोठ्या उत्साहाने, दानधर्म करून, व्रताचरण करून, आवडीच्या पदार्थाचे सेवन करून शयनगृहात गेली. त्याच रात्री शुद्धोधन व महामाया यांचा एकांत होऊन गर्भधारणा झाली. तो दिवस होता आषाढी पौणिमेचा, इ.स. पूर्व ५६४.

२. गौतमाचे महाभिनिष्क्रमण
कपिळवस्तू च्या शेजारी कोलीयांचे राज्य होते. या दोन राज्यात रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून वाद निर्माण होत असे. हा वाद कायमचा मिटवायचा असेल तर युद्धानेच मिटवता येईल असा निर्णय शाक्य संघाने घेताच गौतमाने या निर्णयाचा विरोध केला. संघाचा आदेश तोडल्याबद्दल संघाने गौतमाला शासन म्हणून तीन पर्याय दिले.
अ. सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे.
ब. देहांत शासन स्वीकारणे अथवा देशत्याग करणे
क. कुटुंबाच्या सर्व मालमत्तेची जप्ती व सामाजिक बहिष्कारास राजी होणे.
या पैकी दुसरा पर्याय गौतमाने निवडला. त्यांनी मतापित्यांनी समजूत घातली. परंतु यशोधरेने सुद्धार्थाचीच समजूत घातली,”आपला निर्णय योग्य आहे. मीही तुमच्याबरोबर परिवज्जा घेतली असती पण आपल्या पाठीमागे बाळ राहुल चे संगोपन संगोपन करण्याची जबाबदारी मजवर पडणार आहे. आपण आपल्या सर्व प्रियजनांना सोडून परिव्राजक हिट आहात. तेव्हा आपन असा एखादा जीवनमार्ग शोधून काढाकी तो सकल मानव जातील कल्याणकारी ठरेल” सर्वांचे आशीर्वाद व पाठिंबा घेऊन, राहुल कडे पितृत्वाच्या नजरेने बघून सिद्धार्थाने गृहत्याग केला. मोठ्या कष्टाने आपल्या मातापित्यांन पासून दूर झाला. परिवज्जेचा संस्कार झाला व सिद्धार्थ आपल्या प्रवासाला निघाला. त्यावेळी गौतमाचे वय केवळ २९ वर्षे होते. गौतमाच्या गृहत्यागाला म्हाभिनिसक्रमण असेही म्हणतात. तो दिवस होता आषाढ पौर्णिमेचा. इ.स.पू. ५३४चा.

३ प्रथम धम्मचक्कपवत्तन
सिद्धार्थ गौतमाला संबोधी प्राप्त झाल्यानंतर हे कोणास सांगावे की सांगू नये? की स्वतःची व्यक्तिगत पूर्णावस्था प्राप्त करून घेण्यासाठी आपले जीवन व्यतीत करावे? अशा विचारात होते. कारण बुद्धास सापडलेला मार्ग हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाणारा आहे, ज्ञानयुक्त आहे, गंभीर आहे, सूक्ष्म आहे, म्हबून अज्ञानाच्या आवरणाने आच्छादित क कामासक्त मनुष्याने याचे ज्ञान होणार नाही. म्हणून शेवटी शेवटी तथागताने विचार केला, जगास शांती प्राप्त व्हावी, दुःखातुन सर्वांची मुक्तता व्हावी हे आवश्यक आहे, तेव्हा या सदधम्माचा इतरांस उपदेश देण्याचा निश्चय केला. उपदेश करायचा तर कोणास करावा हा प्रश्न तथागतास पडला, तेव्हा आलारकालाम व रामपूत्ताची आठवण झाली मात्र ते दोघेही मृत्यू पावल्याचे समजले. त्यानंतर निरंजना नदी काठी तपश्चर्येच्या काळात जे पाच शिष्य सोबत होते त्यांची आठवण झाली. त्यांच्या शोधार्थ निघाले. सारनाथ येथील मृगदाय वनात असल्याचे कळल्यावर तथागत तेथे पोहोचले. त्या पंचवर्गीय परिव्राजकांनी बुद्ध आपल्याकडे येत असल्याचे पाहिले तेव्हा त्यांचे स्वागत करावयाचे नाही असे ठरवले. परंतु बुद्ध त्यांच्या जवळ जाताच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा इतका प्रभाव पडला की त्यांनी त्यांचे असाधारण स्वागत केले. व तथागताला अवगत झालेला मार्ग त्यांना कथन केला. दुःखाचे अस्तित्व नष्ट करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखवणे हाच बुद्धाच्या धम्माचा पाया होय.
या धम्मानुसार जर प्रत्येकाने
अ. पंचशीलचे पालन केले.
ब. आर्य अष्टांगिक मार्गाचे पालन केले.
क. दहा पारमितांचे पालन केले तर दुःखाचा निरोध होईल.
बुद्धाचे नव्या धम्माचे प्रवचन ऐकल्यावर ते पाच परिव्राजक तथागतास शरण गेले. ज्या दिवशी या पाच भिक्खुंना धम्मदीक्षा करून प्रवज्जीत केले तो दिवस सोमवार, आषाढ, इ.स.पू.528 हा दिवस होय. पुढे हेच पाच परिव्राजक पंचवर्गीय भिक्खू म्हणून ओळखल्या गेले. या पंचवर्गीय भिक्खुंना दिलेले प्रवचन, यालाच धम्मचक्र प्रवर्तन अथवा धम्मचक्क पवत्तन असे म्हणतात.

४. वर्षावास
पावसाळ्यात कोणा एका विहारात धम्मोपदेश व चिंतन करण्यासाठी वास्तव करणे यासच वर्षावास म्हणतात. तथागतांना प्रथम धम्मोपदेश केला तेव्हा पावसाळा होता. दोन भिक्खुंनी एकत्र न फिरत अलग अलग दिशेने धम्मप्रचार करावयाचा व एका गावी दोन दिवसांपेक्षा अधिक कधीच करायचा नाही असा नियम घालून तथागतांनी दिला होता. मात्र पावसाळ्याच्या तीन महिन्यांच्या कालावधीत कोण्या एक मध्यवर्ती शहराच्या बुद्ध विहारात भिक्खूने मुक्काम करावयाचा व तेथे राहून धम्मदेसना करावी. तथागताने आषाढी पौर्णिमेला इ.स.पू.५२८ या पंचवर्गीय परिव्राजकांना धम्मदीक्षा देऊन पावसाळा असल्याने तिथेच वास्तव करून पहिला वर्षावास केला. वर्षावासाची सुरुवात आषाढ पौर्णिमेला होऊन सबगत अश्विन पौर्णिमेस होते. धम्मदान करणाऱ्या सम्यक सबुद्धाचे स्मरण व्हावे म्हणून याच पौर्णिमेला गुरू पौर्णिमा सुद्धा म्हणतात.
उज्वला गणवीर नागपूर
10/7/2025👈
आषाढ पौर्णिमेच्या सर्वांना मंगल सदिच्छा🌹


COMMENTS