जि. प. शाळा कळमना येथे नवप्रवेशीत विद्यार्थ्यांचे सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते स्वागत.

HomeNewsनागपुर डिवीजन

जि. प. शाळा कळमना येथे नवप्रवेशीत विद्यार्थ्यांचे सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते स्वागत.

गौतम नगरी चौफेर //बादल बेले राजुरा (ता.प्र) :– स्वच्छ, सुंदर, निर्मळ, पर्यावरण पूरक अशा विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणारे जिल्हा स्मार्ट ग्राम कळमना हे नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम मोठय़ा उत्साहाने राबवित असते. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी आज येथील आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते सर्व चिमुकल्यांचे अभिनव असे स्वागत करण्यात आले. यामुळे कळमना येथील बाल गोपाळ, पालक व शेतकरी बांधवांमध्ये आनंददायी वातावरण निर्माण झाले होते. यावेळी बैलबंडी ची छान फुलांनी व फुग्यांनी सजवट करून संपुर्ण गावामधुन प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी पहिला वर्गातील विद्यार्थ्यांनचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. प्रभात फेरी नंतर वर्ग पहिला च्या विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकाचे, शालेय पोषाक व शालेय बुटा चे वाटप करण्यात आले.
       

   या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई, कार्यक्रमाचे अध्यक्ष रंजना दिवाकर पिगे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती तथा ग्रा. प. सदस्य,  प्रमुख पाहुणे बाळकृष्ण पिंगे पोलीस पाटील, ग्रामसेवक सितारामजी मरापे , सुनीता ऋषी उमाटे ग्रा. पं. सदस्य, बेबीनंदा पुणेकर मुख्याध्यापक, श्रावण गेडाम उपाध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, कवडु गौरकार, रामचंद्र कुकुडे, शंकर फिसके, गुरुदेव सेवा मंडळाचे सदस्य डॉ. लटारी बल्की, कवडु पिंगे, विठ्ठल वाढई, सुरेश गौरकार, महादेव आबीलकर, दिलीप निमकर सर, शालीक पेदोर सर, वनिता गौखरे मॅडम उपस्थित होते. या कार्यक्रमाकरीता मदन वाढई , विठ्ठल विददे, संतोष बल्की, योगराज वाढरे शंकर गेडाम, शामराव अटकारे, निलकंठ वाढई, नत्थु वडसकर , विठ्ठल वांढरे, कवडु मुठलकर, पंडीत गेडाम, मंदा गेडाम, संगीता उमाटे, शालुना उमाटे, तन्मय कुकुडे, वाघाडे, शिपाई सुनील मेश्राम, बैलं बंडी चालक प्रशांत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालीक पेदोर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन दिलीप निमकर सर यांनी मानले, यावेळी गावकरी व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

COMMENTS

You cannot copy content of this page