दुसरी धम्म परिषद १२ मे रोजी बुद्ध जयंती निमित्त 

HomeNewsनागपुर डिवीजन

दुसरी धम्म परिषद १२ मे रोजी बुद्ध जयंती निमित्त 

गौतम नगरी चौफेर – दुसरी धम्म परिषद १२ मे रोजी बुध्द जयंतीनिमित्त जेतवन धम्म संस्कार केंद्र आयोजित दरवर्षी प्रमाणे बुद्ध जयंती निमित्त १०० पेक्षा जास्त मुलांना श्रामनेर दिक्षा देऊन १० दिवस धम्म संस्कार रूजविले जातात त्या शिबिराचा समारोप हा बुद्ध जयंती ला करून त्या दिवशी भव्य अशी धम्म परिषद भरते
याही वर्षी १२ मे रोजी बुद्ध जयंती निमित्त भव्य धम्म परिषद आयोजित केली आहे ,पैठण -शेवगाव रोडवरील ठिकाण जेतवन धम्म संस्कार केंद्र, तेलवाडी,येथे बुद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण केंद्र मध्ये बुद्ध जयंती निम्मित बुद्घ धम्म संघाला अनुसरण करणारे लोक जात ,धर्म ,पंथ, रंग, रूप, गरीब श्रीमंत ,सीमा, शहर ,नगर ,वस्ती, जिल्हा, गाव हा मनातील भेदा भेद मिटून बुद्ध जयंती साठी आणि धम्म श्रवण करण्यासाठी लोक दूर दुरून मोठ्या प्रमाणात जेतवन धम्म संस्कार मध्ये एकत्र येतात समस्त बहुजन समाज यांना जेतवन धम्म संस्कार तर्फे जाहीर आव्हान की आपण २ मे पासून श्रामनेर शिबिर आयोजित केले आहे त्याचा समारोप १२ मे बुद्ध जयंती निमित्त भव्य धम्म परिषद चे आयोजन केले आहे तरी आपण ह्या जयंती उत्सव सोहळा मध्ये सहपरिवार सहभागी व्हावे आणि धम्म श्रवण करावा असे आव्हान जेतवन धम्म संस्कार केंद्र चे संस्थापक अध्यक्ष पूज्य भदंत शाक्यपुत्र राहुल यांनी केले आहे

COMMENTS

You cannot copy content of this page