एकसंघ संघटनशक्तीची भावना वृद्धिंगत करण्यासाठी धम्मध्वज दिन कार्यक्रमाचे आयोजन – अशोककुमार उमरे रिपाइं महाराष्ट्र प्रदेश चिटणीस

HomeNewsचंद्रपूर

एकसंघ संघटनशक्तीची भावना वृद्धिंगत करण्यासाठी धम्मध्वज दिन कार्यक्रमाचे आयोजन – अशोककुमार उमरे रिपाइं महाराष्ट्र प्रदेश चिटणीस

गौतम नगरी चौफेर (शिला धोटे) – ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर येथे धम्मध्वजदिन कार्यक्रम संपन्न जगभरातील बौद्धांनी एका ध्वजाखाली येऊन एकसंघ संघटनशक्ती निर्माण करण्यासाठी जागतिक धम्मध्वज दिनाची निर्मिती करण्यात आली. ह्या एकसंघ संघटनशक्तीची भावना तमाम बौद्धांच्या मनात सतत वृद्धिंगत होत राहावी म्हणून आपण जागतिक धम्मध्वज दिन कार्यक्रमाचे आयोजन करीत असतो.  मात्र सध्याच्या परिस्थितीत बाबासाहेबांचे अनुयायी कार्यकर्ते एकसंघ संघटनशक्ती निर्माण करण्यासाठी दिलेल्या पक्ष आणि संघटना याकडे पुर्णतः दुर्लक्ष करून भौतिक सुख सुविधांच्या मागे लागलेला आहे. यातच चळवळीसाठी अत्यंत घातक असलेले निष्क्रिय, बेईमान आणि अज्ञानी या खोगीरभरतीची दिवसेंदिवस वाढ होत असल्याने बाबासाहेबांच्या चळवळीची दुरावस्था होत आहे. संविधानावर विश्वास असलेल्या बाबासाहेबांच्या अनुयायी कार्यकर्त्यांनी संविधानाला प्रमाण मानून यातून मार्ग काढण्याची अत्यंत गरज आहे. असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस अशोककुमार उमरे यांनी केले. ते ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर त कोरपना जि चंद्रपूर येथे संपन्न झालेल्या जागतिक धम्मध्वज दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले.

ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूर येथे तारीख ८ जानेवारीला संपूर्ण जगात साजरा होणाऱ्या जागतिक धम्मध्वज दिन कार्यक्रमाचे दिनांक ८ जानेवारी २०२६ रोज गुरुवारला आयोजन करण्यात आले. पंचशील युगप्रवर्तक बहुहितकारी संस्था हरदोना खुर्द द्वारा जोगाई तथा बुद्धभूमी विकास व संवर्धन समिती गडचांदूर व्दारा जागतिक धम्मध्वज दिन समारोह २०२६ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तारीख ८ जानेवारी २०२६ रोज गुरुवारला सकाळी पहिल्या सत्रात आदरणीय भंते कश्यप यांच्या हस्ते स्थळ- ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर येथे सकाळी ०९:०० वाजता धम्मध्वजारोहण करण्यात आले. भंते कश्यप यांनी बुद्ध वंदना आणि धम्मध्वज वंदना घेतली. सदर प्रसंगी अशोककुमार उमरे, दशरथ डांगे, प्रभाकर खाडे, पंडित डोंगरे, श्रावण जीवने,  समता सैनिक दल आणि दी बुद्धीस्ट सोसायटी आॉफ इंडिया/ भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने युनिट लिडर बादल चांदेकर संघमित्रा ताकसांडे, सिमा खैरे, ज्योत्स्ना तोडे, सविता वाघमारे, आशाताई सोनडवले, जया खैरे, रेखा वाघमारे यांची चमूने धम्मध्वजाला मानवंदना देण्यात आली.

दुसऱ्या सत्रात सकाळी ११ : ०० वाजता भदंत धम्मसारथी मुख्य धम्म प्रशिक्षक, धम्म प्रशिक्षक भंते राहुल, धम्म प्रशिक्षक भंते राहुलबोधी, धम्म प्रशिक्षक बुद्धवंश बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बुद्धीस्ट सेमिनारी नागपूर यांनी धम्मदेसना दिली. तिसऱ्या सत्रात दुपारी ०१ : ०० वाजता अशोककुमार उमरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस यांच्या अध्यक्षतेखाली धम्म / समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सदर कार्यक्रमाचे उद्घाटक भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष श्रावणजी जीवने, स्वागताध्यक्ष अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभाऊ उपरे, मधु बावलकर आदिलाबाद, जि. एस. कांबळे गुरूजी,  सोमाजी मून, शाहीर तुकाराम जाधव कोरपना इत्यादीं मार्गदर्शन केले.

प्रमुख पाहुणे म्हणून संपादक गौतम धोटे आवाळपूर, डॉ. प्रा. सोमाजी गोंडाने, सोमेश्वर सोनकांबळे, पंडित डोंगरे, मारोती झोडे,सागर बोरकर, मुनेश्वर मेश्राम, समाधान सोनकांबळे, प्रकाश कवाडे, नेमीचंद कातकर परसोडा, मधुकर चुनारकर, कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष गौतम भसारकर सुत्र संचालन प्रा. भानुदास पाटील आणि आभार प्रदर्शन किशोर डोंगरे करणार आहेत. समितीच्या वतीने पंडित डोंगरे यांनी भोजन दानाची उत्तम व्यवस्था सांभाळली. कार्यक्रमाचे आयोजक जोगाई तथा बुद्धभूमी विकास व संवर्धन समितीचे अध्यक्ष दशरथ डांगे, कार्याध्यक्ष प्रभाकर खाडे, उपाध्यक्ष प्रकाश भसारकर, सचिव किशोर डोंगरे, सहसचिव पंडित डोंगरे, कोषाध्यक्ष प्रा. भानुदास पाटील तथा सभासद शिला निरंजने, विठ्ठल कोठारे, नितीन भगत, सुभाष सिरटकर, विजय फुलझेले, वारलू नळे, मुनेश्वर मेश्राम, जगजीवन बोरकर, दिनेश गायकवाड, रामदास रामटेके, विजय खोंडे, देवराव भगत, नामदेव लांडगे, गणेश कांबळे, विनोद खाडे, पंढरी रामटेके, रविचंद्र वाघमारे, सिद्धार्थ कांबळे, रमेश सोनटक्के, सुनील वालदे, सुरेश धोंगडे, गजानन वाघमारे, गजानन ताकसांडे, शरद बोरकर, मारोती झोडे, संगीता झोडे, हंसराज ताकसांडे, आकाश ताकसांडे, मंगेश नगराळे, मधुकर खाडे, श्वेता लोणारे, सुनील पाटील, निलेश रामटेके, विष्णूदास गजभिये, विजय वैरागडे, संजय वैरागडे, राजू कांबळे, सुनील फुलझेले, उज्वला खाडे, वनमाला नरवाडे, मंजुषा ताकसांडे, रेखा फुलझेले, सारिका सोनटक्के, रूपिका वानखेडे, पौर्णिमा उमरे, पौर्णिमा भसारकर, नरेंद्र वानखेडे, शंकर भगत, रविदास करमनकर, दर्शन बदरे, जयभारत धोटे, चंद्रभान डोंगरे, इत्यादींनी मोलाचे योगदान दिले.यावेळी चंद्रपूर ज्ह्यातील नामवंत गायक आयु  सदानंद बी टिपले
यांनी भीम गित गावून  या कार्यक्रमाची सांगता केली.

COMMENTS

You cannot copy content of this page