जोरगेवारांना भाजपने स्वीकारले

HomeNewsनागपुर डिवीजन

जोरगेवारांना भाजपने स्वीकारले

मुनगंटीवारांच्या हस्ते पक्ष प्रवेश; महायुतीतील भाजपची उमेदवारी जाहीर


गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी चंद्रपूर) २७ : चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी उमेदवारीसाठी महाविकास आघाडी, महायुतीतील सर्वच पक्षांचे दरवाजे ठोठावले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने पक्षप्रवेश करीत उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. परंतु, काँग्रेसच्या विरोधानंतर पक्षप्रवेश झाला नाही. स्थानिक भाजपनेही त्यांना विरोध केला. यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या आणि रविवारी (ता. २७) आमदार किशोर जोरगेवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची उपस्थिती होती. स्थानिक हॉटेल एन. डी. येथे पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील उमेदवार पक्षाने जाहीर केले आहेत. आज दुपारपर्यंत चंद्रपूर मतदारसंघातील सहाव्या उमेदवाराचे नाव जाहीर होईल. चंद्रपूर जिल्ह्यातील सहा व गडचिरोली जिल्ह्यातील तीन अशा एकूण नऊ जागा भाजप व महायुती जिंकणार आहे. जाहीरनामा व वचननाम्यात चंद्रपूर जिल्ह्याला झुकते माप राहील. भाजप हा परिवार आहे, या परिवारात जोरगेवार व महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्ष नम्रता आचार्य यांचे स्वागत आहे. या दोघांच्या प्रवेशाने भाजपची शक्ती या जिल्ह्यात वाढली आहे. या विधानसभा निवडणुकीत भाजपला व महायुतीला यश मिळेल, असा विश्वास मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीत कार्यकर्ते पूर्णशक्तीने काम करतील. दिल्ली येथे पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते ब्रिजभूषण पाझारे यांना उमेदवारी मिळावी यासाठी गेलो होतो. जोरगेवार यांना उमेदवारी देऊ नका यासाठी गेलो नव्हतो, असेही मुनगंटीवार म्हणाले. राजुरा येथे भाजपचे काही नाराज पदाधिकारी पत्रकार परिषद घेणार आहे अशी माहिती आहे. मात्र भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी तिथे लक्ष घातले असून ही पत्र परिषद होणार नाही असे मुनगंटीवार यांनी सांगितले. पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते नाराज झाले आहेत असे सांगण्यात येत असले, तरी नाराज व अन्याय आलेल्या कार्यकत्यांचे योग्य पुनर्वसन केले जाईल. भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा व राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी तसे आश्वासन दिले आहे.

भाजपचा आत्मा हा कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्यांला वाऱ्यावर सोडणार नाही. प्रत्येकाला न्याय मिळेल, कुणावर अन्याय होणार नाही, अन्यथा कार्यकत्याँची अवस्था बंद झालेल्या दोन हजाराच्या नोटसारखी होईल, भाजपमध्ये कार्यकर्ते नाराज होतील. मात्र पक्षाचा विचार सोडणार नाही. त्यामुळे पाझारे भारतीय जनता पाटी चंद्रपूर। आमदार किशोर जोरगेवार यांचे पक्षात स्वागत करताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार. बंडखोरी करून निवडणुकीत उभे राहणार नाहीः कार्यकर्त्याला हवेवर सोडणार नाही, मला जिल्ह्यातील भाजपच्या सर्व कार्यकत्यांची चिंता आहे. त्यांच्यावर अन्याय होणार नाही. २६ नोव्हेंबर रोजी राज्यात महायुतीचे सरकार येईल असाही विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. यावेळी महानगर अध्यक्ष राहुल पावडे, ग्रामीण अध्यक्ष हरीश शर्मा, प्रमोद कडू, डॉ. मंगेश गुलवाडे आदीची  उपस्थितीत  होते. पक्षप्रवेशाला आमदार जोरगेवार यांनी जोरदार शक्तिवादार जोर

COMMENTS