राजुरा आगारच्या बसा गडचांदूर ते  जिवती कडे नगराळा जाणाऱ्या बसा चालू करण्याची मागणी

HomeNewsनागपुर डिवीजन

राजुरा आगारच्या बसा गडचांदूर ते  जिवती कडे नगराळा जाणाऱ्या बसा चालू करण्याची मागणी

गौतम नगरी चौफेर (कृष्णा चव्हाण जिवती) – राजुरा आगार च्या गडचांदूर ते जिवती कडे नगराळा जाणारे बस बंद झाल्यामुळे लोकांचा  खाजगी वाहनाने प्रवास
जिवती च्या 90 % बस फेऱ्या रद्द चंद्रपूर जि , जिवती तालुका हा राजुरा आगार क्षेत्रात येतो. पण राजुरा आगार व्यवस्थापक यांनी जाणीवपूर्वक जिवती तालुक्याकडे दुर्लक्ष केले आहे. लोकांना नाईलाजाने खाजगी वाहणाने प्रवास् करावा लागत आहे. जिवती हा तालुका असून सुद्धा सायंकाळी जिवती ते गडचांदूर जाण्यासाठी एकही बस नाही. नियमित बस सेवा चालू करावी. अन्यथा आंदोलन करू असा इशारा जिवती च्या लोकांनी केला आहे. रद्द करण्यात आलेल्या बस.१ ) येल्लापूर २) शेडवाही ३) भारी ४) परमडोली जिवती तालुक्यातील असंख्य आय टी आय चे विद्यार्थी विद्यार्थिनी गडचांदूर येथील शाळा, महाविद्यालयात, शिक्षण घेत आहेत. त्यांचे जाण्या- येण्याची एसटी बसचे पासेस सुद्धा काढलेले आहेत. परंतु गेल्या चार-पाच दिवसापासून ती बस बंद असल्यामुळे मुलांना खाजगी वाहनाने अत्यंत जीव धोक्यात घालून या ठिकाणी प्रवास करावा लागत आहे. तेव्हा त्या बसच्या काढलेल्या पासेस हे विद्यार्थी विद्यार्थिनींना जाण्या – येण्यासाठी सोयीचे व्हावे. व पालकांनाही कोणती चिंता सुरक्षित प्रवास हा त्यांच्या मागचा उद्देश आहे एसटी बसेस महामंडळाचा गलथान कारभारामुळे व त्यांचा नियोजन शून्य ते मूळे व अधिकार्‍याचा हलगजी पणामुळे या ठिकाणीही एसटी बसेस बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना  जीव मुठीत घेऊन खाजगी वाहनाने व मालवाहतूक करणाऱ्या वाहनाने ही प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे तात्काळ बस सुरू करावी.अशी विद्यार्थीची व पालकाची मागणी जोर धरून लागली आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांने गांभिर्यांने लक्ष घालून जिवती ते गडचांदुर नगराळा मार्गे ही सायंकाळची बस तात्काळ सुरू करावी करावी. अशी विनंती पालकांकडून केली जात आहे. जिवती हा तालुका असून तेथील सामान्य प्रवाश्याला पण बस असावी ही सामान्य मागणी आहे, मागणी पूर्ण न झाल्यास आगार व्यवस्थापक कार्यालय राजुरा ला इथे नाईलाजाने मोर्चा काढला जाईल.

COMMENTS

You cannot copy content of this page