मोबदला नाही, नोकरी नाही; प्रकल्पग्रस्त कुटुंबांचे उपोषण
गौतम नगरी चौफेर // गौतम धोटे //चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना आदिवासी बहुल तालूक्यातील विरूर //गाडेगाव: वेकोलि वणी क्षेत्र अंतर्गत पैनगंगा कोळसा खाणीसाठी चांदूर शेतजमीन अधिग्रहीत करूनही योग्य मोबदला व नोकरी मिळाली नाही, असा आरोप करत विरूर व बोरगाव येथील आठ प्रकल्पग्रस्त शेतकरी कुटुंबे १५ जून २०२५ पासून पैनगंगा कोळसा खाणीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आमरण उपोषण करीत आहेत. ते मुलाबाळांसह
वेकोलि प्रशासनाने ४ जुलै २००९ रोजी विरूर व बोरगाव येथील वामन मालेकर, शंकर सपाट, सुभाष वांढरे, मधुकर वांढरे, भालचंद्र डाहुले, शांताराम खांडाळकर यांची शेती अधिग्रहीत केली. मात्र, मोबदला मिळालेला नाही. शेतकन्यांनी चौकशी केल्यानंतर विश्वनाथ सोनटक्के हे बनावट कागदांच्या आधारे नोकरी व मोबदल्याचा लाभघेतला, असा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.







COMMENTS