गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) – साकोली तालुक्यातील एकोडी येथील ग्रामपंचायत सदस्य तथा प्रबोधनकार कला, साहित्य संघटना चे भंडारा जिल्हाध्यक्ष कवी, गायक, संगीतकार, प्रबोधनकार, नाट्य कलावंत, तबलावादक भावेश कोटांगले यांनी आपल्या वाढदिवसाचे औचिप्त साधून एक कोडी गावातील बुद्ध उपासक, उपासिका व समाज बांधवांना बुद्ध वंदना पुस्तक वाटप केले. त्यामध्ये बुद्धांनी सांगितलेल्या सर्व गाथा त्या पुस्तकामध्ये समाविष्ट आहेत. एक सामाजिक बांधिलकी म्हणून दररोज बुद्धाची वंदना प्रत्येक घरी झाली पाहिजे हाच उद्दिष्ट ठेवून बुद्ध वंदना पुस्तकाचे वितरण करण्यात आले. यावेळी सर्व बुद्ध उपासक उपासिका प्रामुख्याने उपस्थित होते.
COMMENTS