जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बांधकाम मंत्री ग्रामविकास मंत्री यांना निवेदन
गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) – राज्य अभियंता संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा भंडाऱ्याच्या वतीने कॉन्ट्रॅक्टर महासंघ व राज्य अभियंता संघटनेच्या बैठकीत महाराष्ट्र शासन कॉन्ट्रॅक्टदार यांचे 36 ते 40 हजार कोटी रुपयांची देयके न दिल्याने व इतर कोणत्याही मागणी संदर्भात शासन निर्णया नसल्याने महाराष्ट्र शासनाच्या विरोधात राज्यातील व विकास कामांच्या मोठा निर्णय जाहीर करून कॉन्ट्रॅक्टदारावर आज उपासमारीची पाळी आलेली आहे .याबाबत सविस्तर वृत्त असे की, 25 सप्टेंबर 2024 रोजी राज्यातील ओपन छोटे-मोठे कॉन्ट्रॅक्टदार, सुशिक्षित बेरोजगार, स्थापत्य अभियंता व या व्यवसायावर अवलंबून असणारे अनेक घटकांची ऑनलाईन बैठक पार पडली. सदर बैठकीत राज्य अभियंता संघटनेच्या मागण्या संदर्भात शासनाकडून ठोस काही आश्वासन व कृती न झाल्याने राज्यातील सर्व विभागाकडून विकासाची कामे दिनांक 30 सप्टेंबर 2024 पासून बेमुदत संप करण्याचा व दिनांक 8 ऑक्टोंबर 2024 रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन येण्याचा निर्णय घेण्यात आला होता .त्या अनुषंगाने 8 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्य कॉन्ट्रॅक्टदार महासंघ व राज्य अभियंता संघटना भंडारा जिल्ह्याच्या वतीने आंदोलन करण्यात आले .त्या प्रमुख मागण्यांमध्ये राज्यातील सर्व विभागाकडील कॉन्ट्रॅक्टदार व विकास कामांची प्रलंबित 40 हजार कोटीचे देयके तातडीने देण्यात यावी, यापुढे सरकारी कामे मंजूर करताना त्यास शंभर टक्के निधी तरतूद असल्याशिवाय कामे मंजूर करू नये ,राज्यातील सर्व विभागाकडील कामांची विभागणी सुशिक्षित बेरोजगार ,अभियंता, मजूर संस्था ,ओपन कंट्रकदार ,शासन निर्णयानुसार ते 33 .33 .34 .व्हावी व ग्रामविकास विभागाची 40. 26. .34 व्हावे शासन निर्णयानुसार व्हावे, राज्यातील छोटे कामाचे अजिबात एकत्रिकरण करू नये ,व मोठ्या निविदा नियमबाह्य पद्धतीने काढू नये ,राज्यातील कंत्राटदार विकास त्यांना सरकारी कामे करताना संरक्षण कायदा मंजूर करण्यात यावा ,20 सप्टेंबर 2024 रोजी च्या ग्रामविकास विभागाचा अन्यायकारक शासन निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा ,वरील मागण्याचे निवेदन भंडारा जिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ,सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, सार्वजनिक ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन ,यांना जिल्हाधिकारी भंडारा मार्फत देण्यात निवेदन आले , इंजिनीयर मोईन खान राज्य उपाध्यक्ष, इंजिनीयर रोशन जांगडे जिल्हाध्यक्ष ,इंजिनिअर संजय नासरे जिल्हा सचिव ,इंजिनिअर मोहित लांजेवार ,इंजिनिअर सलमान खान, इंजिनिअर सिराज खान, इंजिनिअर प्रतीक कळंबे ,इंजिनिअर सिद्धांत गावंडे ,इंजिनिअर पराग केवट, इंजिनियर गौरव साळवे ,इंजिनिअर पराग झंजाड ,इंजिनियर ऋषी भुरे ,इंजिनिअर जवाहर कुंभलकर ,इंजिनिअर संतोष लांजेवार, इंजिनिअर पारितोष ठवकर ,इंजिनिअर देवेंद्र निखाडे ,इंजिनिअर प्रवीण गजभिये ,इंजिनिअर संदीप चकोले ,इंजिनिअर शुभम पारधी ,इंजिनिअर स्वप्निल सोनकुसरे, इंजिनियर चेतन हटवार इंजिनिअर निशांत बुराडे व संख्या इंजिनियर यावेळी उपस्थित होते.
COMMENTS