माजी जि. प. अध्यक्ष देवरावदादा भोंगळे यांना पेसा पात्रताधारकांची निवेदनातून मागणी
गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी प्रमोद कोडापे) – आज दिनांक. 9.10.2024 रोज बुधवार ला राजुरा विधानसभेतील पेसा क्षेत्रातील 17 संवर्गापैकी व शिक्षण विभाग मानधन तत्वावरील शिक्षक नियुक्ती आदेश येत्या आचारसंहितेधी मिळावे याकरिता राजुरा विधानसभा पेसा क्षेत्रातील उमेदवारांनी आज अनु.जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री. अरुणजी मडावी यांचे नेतृत्वात आज राजुरा येथे माजी जि. प. अध्यक्ष श्री. देवरावदादा भोंगळे यांची भेट घेऊन येत्या आचारसंहितेधी पात्रता धारकांना नियुक्त्या देण्याकरिता जिल्हा परिषद शिक्षण विभाग व इतर 17 संवर्ग या प्रश्नावर आज निवेदन दिले, मान. देवराव दादा भोंगळे यांनी तात्काळ मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. चंद्रपूर यांचेशी भ्रमणध्वनी द्वारे संदेश साधून पात्रताधारकांना येत्या 2 दिवसात नियुक्ती आदेश द्यावे असे कळविले मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. चंद्रपूर यांनी पेसा पात्रताधारकांचा विषय लक्षात घेऊन लवकरच नियुक्ता देणार असल्याचे कळविले. आता पात्रताधारकांना 2दिवसात नियुक्तीपत्रे मिळणार, त्याबद्दल पेसा क्षेत्र पात्रताधारकांनी आदरणीय देवरावदादा भोंगळे माजी जि. प. अध्यक्ष यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले . यावेळी कोरपणा तालुका भाजपा महामंत्री प्रमोद कोडापे, जेष्ठ नेते नागोराव आत्राम, जिवन गेडाम, नागेश आलाम, माधुरी मेश्राम, प्रशांत कोटनाके आदी पेसा पात्रता धारक उपस्थित होते.
COMMENTS