गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा – आज दुपारी राजुरा तालुक्यातील मौजा देवाडा येथील विजय जंगू मंडली (वय २१ वर्षे) यांचा शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी ऐकून मन सुन्न झाले. ही घटना अत्यंत वेदनादायी आहे. या दु:खद प्रसंगी मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबात त्यांची आई व ते असा दोघांचाच कुटुंब होता. त्यामुळे मंडली कुटुंबासाठी ही दूर्घटना म्हणजे एकप्रकारे आघातच आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत. या कठीण काळात त्यांच्या कुटुंबाला बळ मिळो, अशीही मी प्रार्थना करतो.
या घटनेच्यासंदर्भात मी प्रशासनाला तातडीने पंचनामा करण्याचे निर्देश देत आहे. विजय मंडली यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.
आमदार देवराव भोंगळे
राजुरा विधानसभा
COMMENTS