HomeNewsनागपुर डिवीजन

महसूल सप्ताह अंतर्गत  विशेष सहायता योजनेंतर्गत DBT न झालेल्या लाभार्थ्यांना घरोघरी जाऊन DBT करून नोंद घेण्यात आली

()देण्याची कार्यवाही()
गौतम नगरी चौफेर (गौतम धोटे) – आज दिनांक ५ ऑगस्ट २०२५ रोजी विशेष सहायता योजनेंतर्गत DBT (Direct Benefit Transfer) लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांची घरोघरी जाऊन नोंद घेण्यात आली व संबंधितांना DBT प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत संबंधित तलाठी व ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायती अंतर्गत DBT झालेल्या व न झालेल्या लाभार्थ्यांची यादी तयार केली. या यादीचे प्रदर्शन प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात व अन्य महत्त्वाच्या ठिकाणी करण्यात आले. DBT न झालेल्या लाभार्थ्यांच्या समस्यांचे कारण समजून घेऊन आधारकार्ड व बँक खात्याशी लिंकिंगबाबत मार्गदर्शन करण्यात आले. Inactive आधारकार्ड पुन्हा सक्रीय करण्यासाठी व आधार मोबाईल लिंकसाठी लाभार्थ्यांना योग्य सूचना देण्यात आल्या.वयोवृद्ध, दुर्गम व अतीदुर्गम भागातील तसेच आजारी लाभार्थ्यांना विशेष मोहिम राबवून DBT करण्याची कार्यवाही केली. सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत शिधापत्रिकाधारकांची KYC प्रक्रिया करून घेण्याची कार्यवाही करण्यात आली.
या उपक्रमासाठी तालुकास्तरीय अधिकारी मा. तहसीलदार, नायब तहसीलदार, तहसील कार्यालय कर्मचारी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी व इतर विभागांनी समन्वय साधून उत्तम प्रकारे कार्य पूर्ण केले.

COMMENTS

You cannot copy content of this page