गौतम नगरी चौफेर संतोष पटकोटवार गडचांदूर //चंद्रपूर :विसापुर टोलनाका येथे टोल वाचविण्याच्या प्रयत्नातून टोल नाका कर्मचाऱ्याचा अंगावरून गाडी नेले असता टोल कर्मचारी गंभीर जखमी झाला. संजय अरुण वांढरे (२७) रा. गांधी वार्ड बल्लारपूर असे जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
आज रविवार ८ मे रोजी रात्री १२.४० बल्लारपूर वरून चंद्रपूर कडे माल घेऊन जाणारी टाटा एस या वाहनाचा चालक टोलनाका वाचविण्याकरीता टोल फ्री लेन वरून जात होता. त्याला तेथील कर्मचारी संजय अरुण वांढरे (२८) रा. गांधी वॉर्ड बल्लारपूर हा थांबविण्याचा प्रयत्न केले. तसेच तेथील उपस्थित कर्मचाऱ्यांनी सुद्धा वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु टाटा एसच्या वाहन चालकाने त्यांच्या अंगावरूनच वाहन नेले. त्यात संजय वांढरे हा जखमी झाला असून त्याचे बरगडीचे हाडे तुटले आहे. त्याच्यावर चंद्रपूरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेची बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून चालक फरार झाला आहे. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.


COMMENTS