गौतम नगरी चौफेर (संतोष पटकोटवार) – गडचांदुर येथे अठरा सदस्यीय नगरपरीषद आहें मात्र नगरपरिषदेच्या पदाधिका–यांचा कार्यकाळ समाप्त झाल्याने गडचांदुर शहराचा कारभार प्रशासकीय अधिकारी यांचे कड़े गेला आहे, त्यामुळे वार्डातील समस्या कोणाला सांगावे असा प्रश्न नागरीकापुढे नव्हाने उपस्थित झाला आहे.
काही लोकांना अजूनही माहीत नाही की नगरपरिषदेच्या पदाधिका-यांचा कार्य काळ समाप्त झाला म्हणुन अजूनही काही लोकं माजी नगरसेवकांना आपले गारहाने सांगतात, समस्या सांगूनही नगरसेवक लक्ष देत नसल्याने नागरिक बोंबा मारत आहेत, पावसामुळे जिकडे तिकडे समस्याच समस्या पहायला मिळत आहे, त्यापैकी मुख्य समस्या म्हणजे ओपन स्पेस मधील हिरवे गवत साफ करणे मुलांना खेळण्याकरीता व प्रौढांना फीरण्याकरीता ओपन स्पेस स्वच्छ असायला पाहीजे मात्र नगरपरिषदेच्या कर्मचा-यांचे याकड़े दुर्लक्ष होत असल्याने ओपन स्पेस मध्ये हिरवे गवत आणी चिखल पहायला मिळत असल्याने घानिचे साम्राज्य निर्माण झाले आहे, तरी ओपन स्पेस मधील हिरवे गवत साफ करण्याची मागणी शहरातील काही सुज्ञ नागरीकांनी केली असुन या समस्येकडे नगरपरिषदेच्या मुख्य अधिका-यानी लक्ष द्यावें अशी मागणी सूधा नागरीकानी केली आहे 🙏 सविस्तर वाचा🙏
अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारे
(सामान्य जनांचा बुलंद आवाज )
👆 गौतम नगरी चौफेर 👆
(बातमी व जाहिराती साठी संपर्क)
(संतोष पटकोटवार (8888794594
( गौतम धोटे (9637708593)
(प्रभाकर खाडे (9765932503)
🌀🌐👁️🗨️ ❤️👁️🗨️🌐🌀
COMMENTS