तिकडे सुरू “हिवाळी”, इकडे उपोषण आंदोलन इशा-याने वातावरण “गरम”

HomeNewsनागपुर डिवीजन

तिकडे सुरू “हिवाळी”, इकडे उपोषण आंदोलन इशा-याने वातावरण “गरम”

शिवनगर वासियांचा पुन्हा एल्गार ; अन्याय कुठपर्यंत सहन करावा ; पुन्हा दिले निवेदन ; १२ वर्ष केवळ नाचविले “कागदी घोडे”
गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा- तिकडे नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू झाले. तर इकडे साकोली तालुक्यातील परसोडीतील शिवनगर वासियांनी आता सीमांकन विषयी प्रशासनाच्या विरोधात उपोषण व आंदोलनाचा इशारा देऊन वातावरण गरम केले आहे. आज सोमवार ०८ डिसेंबरला नवी वस्ती शिवनगर (पोवारटोली) गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कमेटीची तातडीने सभा घेऊन पुन्हा तहसिलदार यांना निवेदन सादर केले. १२ वर्ष लोटले सुद्धा, आता अन्याय कुठपर्यंत सहन करावा असे म्हणत थेट उपोषणाचा इशारा दिल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे.        

प्रकरण हे की, परसोडी/सौं. येथील २०१५ – १६ ला जुन्या ठिकाणी नविन आबादी मध्ये कोणतेही सीमांकन न करता जनतेची शिवनगर ही वसाहत बसली. पण गाव सीमा नसल्याने इतर लोक अतिक्रमणे काढून यांच्या घरापर्यंत कब्जा करण्याचा प्रयत्न करतात. असे कुठपर्यंत सहन करायचे. कितीदा पत्र द्यायचे. म्हणूनच आज सोमवारी ता. ०८ ला गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कमेटीची तातडीची बैठक घेतली. व थेट तहसिल कार्यालय जाऊन पुन्हा निवेदन सादर केले. यात नमूद केले आहे की, २०१५ – १६ ला शिवनगर पोवारटोली ही विना सीमांकनने जागा देण्यात आली. व कोणतीही आर्थिक मदत, नागरी सुविधा उपलब्ध झाली नाही. यामुळे जनतेला विविध समस्यांचा तीव्र सामना करावा लागतो. नविन पुनर्वसन शिवनगर / पोवारटोली येथे सर्व नागरिकांनी घरे बांधून वास्तव्य करीत आहेत. यामध्ये यांनी वारंवार शासनाला पत्रव्यवहार करून सुद्धा प्रशासन आणि राजकीय नेत्यांचे दूर्लक्ष आहे. व आता प्रशासनाच्या विरोधात आंदोलन किंवा उपोषण करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य तुळशीदास पटले आणि शिवनगरवासी देत आहोत. असे निवेदन पुन्हा एकदा सादर केले आहे.     

या सर्व विषयांवर २९/०५/२०१२ ला जिल्हाधिकारी भंडारा यांनी आदेश पत्र सुद्धा दिले. यात विषयांकित मौजा पोवारटोली ( परसोडी ) ता. साकोली येथील पुरग्रस्तांचे पुनर्वसन करीता गट क्र. १४७ क्षेत्र ४.०० हे. आर जागेला प्रशासकीय मंजुरी देण्याबाबद. दूसरे पत्र तहसिलदार यांचे ११/०७/२०२४ चे यात मौजा परसोडी पुनर्वसन गावाबाबद नागरी सोयी सुविधा सद्यस्थिती अहवाल सादर करणेबाबद. तिसरे पत्र २१/१०/२०१५ चे जिल्हाधिकारी भंडारा यांना तहसिलदार यांचे, यात पोवारटोली येथे नागरी सुविधा अंतर्गत कामांना मंजुरी प्रदान करण्याबाबद. असे विविध पत्र ग्रामपंचायत सदस्य तुळशीदास पटले यांकडे असून फक्त कागदी घोडेच नाचवायचे कार्य १२ वर्षांपासून सुरू आहे. आता अजून किती अन्याय सहन करावा.? आता आम्ही थेट गावकऱ्यांसह उपोषण आणि आंदोलनाचा इशारा देत आहोत. याला प्रशासन जबाबदार राहणार आहे. अशी प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी तहसील कार्यालय परीसरात दिली. व पुन्हा सरपंच उपसरपंच व गावकऱ्यांसह निवेदन सादर केले.

COMMENTS

You cannot copy content of this page