गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा: तालुक्यातील अहेरी शेतशिवारात वीज पडून मधुकर सोयाम यांच्या मालकीच्या एका बैलाचा शेतात जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास घडली. राजुरा तालुक्यातील अहेरी येथील शेतकरी चंद्रभान चौधरी यांचे शेतात कपाशी डवरणीचे काम करीत असताना अचानक पावसासह विजांच्या कडकडाटाला सुरुवात झाली. यावेळी डवरणीसाठी चंद्रभान चौधरी यांचे शेतात गेलेल्या मधुकर सोयाम यांच्या मालकीच्या एका बैलावर अचानक वीज कोळसल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाला. खरीप हंगामात सध्या शेतीच्या कामांची लगबग सुरु झाली असून बैलाचा वीज पडून मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


COMMENTS