गडचांदुर पोलिसांची गांजा विक्री करणाऱ्या दोघांवर कार्यवाही ; २ किलो ११ ग्रॅम गांजा जप्त…

HomeNewsनागपुर डिवीजन

गडचांदुर पोलिसांची गांजा विक्री करणाऱ्या दोघांवर कार्यवाही ; २ किलो ११ ग्रॅम गांजा जप्त…

गौतम नगरी चौफेर  //गदचांदुर //कोरपना, १४ नोव्हे. :- वरझडी शेत शिवारात अंमली पदार्थ विक्री होत असल्याची माहिती गडचांदुर् पोलिसांना मिळाली. सदर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी बैलमपुर मार्गे वरझडी शेत शिवारात पायदळ कॅनल च्या बाजूला झाडाखाली दोन ईसम बसलेले पोलिसांना दिसून आले. त्यांना विचारणा केली असता समपर्क उत्तर न मिळाल्याने आजूबाजूला झडती घेतली असता पोपटी रंगाचे गाठोडे आढळून आले. यात हिरव्या रंगाची पाने, फुले व बोंडे असलेला गांजा सदृश्य अंमली पदार्थ मिळाला. याचे वजन केले असता त्याचे वजन २ किलो ११ ग्रॅम झाले. या गांजा सह गडचांदुर येथील ईरफान सय्यद ईस्माइल व बैलमपुर येथील अनिल जगेराव आडे या दोघांवर गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापार परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदर कार्यवाही काल १३ तारखेला करण्यात आली.

सदरची कारवाई चंद्रपूर पोलीस अधिक्षक, अप्पर पोलीस अधिक्षक, गडचांदुर उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व गडचांदुर पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात पोऊपनी पंकज हेकाड, डिबी पथकातील पोहवा शितल बोरकर, नापोअ/बलवंत शर्मा, पोअं प्रकाश बाजगीर, सूरज ढोले, मनोहर जाधव, साईनाथ उपरे यांनी पार पाडली असून पुढील तपास सुरू आहे

COMMENTS

You cannot copy content of this page