पक्ष ठरेना प्रचार🎤 मात्र धडाक्यात

HomeNewsनागपुर डिवीजन

पक्ष ठरेना प्रचार🎤 मात्र धडाक्यात

कोरपना–राजुरा- जिवती आदि तालूक्यात
गौतम नगरी चौफेर गौतम धोटे :– जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजायचा बाकी असला तरी ग्रामीण भागात वातावरण तापायला लागले आहे पक्ष निश्चित नाही उमेदवार ठरले नाही पॅनलची आखणीही सुरू नाही तरीपण प्रचार मात्र जोमात सुरू दिसून येत आहे.

गावागावात सध्या मीच पुढचा सदस्य हळुवार मोहीम सुरू आहे कोणी हळूच अंगनात चहा घेत बसलेले तर कोणी रात्री सभा घेऊन गावाच्या विकासासाठी मी योग्य अशी वचने देत आहेत. फरक एवढाच की पक्ष अजून ठरलेला नाही महाविकास आघाडी, महायुती या दोन्हींमध्ये स्थानिक पातळीवर युती होणार नाही निश्चित झाल आहे. एका गटामध्ये पाच-सहा पक्ष मैदानात उतरणार म्हणजेच यंदा निवडणुकीत श्री कॉर्नर नव्हे तर सिक्स कॉर्नर फाईट असणार आहे एकंदरीत निवडणुकीची शिट्टी वाजवायची बाकी आहे पण मैदानावर धाव सुरू झाली आहे.

त्यामुळे होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत कुणी कुणाचा नाही हे चित्रच या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरणार आहे
        💉💉💊💉💉

COMMENTS

You cannot copy content of this page