गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात सुमठाना येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार – डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान दिन व महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिनांक 28 डिसेंबर २०२५ रोज रविवारला स्थळ तथागत बुद्ध विहार नवीन सुमठाना तालुका भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथे भारतीय संविधान सन्मान राष्ट्रीय गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश टिपले, कार्यक्रमाचे उद्घाटक रमेशचंद्र राऊत यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख मार्गदर्शक ज्येष्ठ साहित्यिक मधुकरराव बावनकर, एडवोकेट पुनम वाघमारे, डॉक्टर अजय दहेगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय वानखेडे, प्रवीण कवाडे, प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे, माजी समाज कल्याण सभापती बिजभुषन पाझारे, श्रीधर भगत, प्रभाकर डोंगरे , माजी नगरसेवक राहुल चौधरी, नितीन मेश्राम, ज्येष्ठ साहित्यिक सु. वी. साठे, यशवंत लिपटे, माजी नगरसेवका सीमा ढे ग डे, माजी नगरसेविका ज्योती भगत, विकास दुर्योधन, प्रवीण कवाडे, नाना देवगडे, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील किरणापुर येथील प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप बागवान कडबे यांच्या पुष्पगुच्छ प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह देऊन – भारतीय संविधान सन्मान राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी के पाटील वर्धा, ज्येष्ठ समाजसेवक सुफी सय्यद शमशो दी न, बी आर ढगे, पत्रकार संतोष सोनवा ने, प्राध्यापक महादेव ग पा ट, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक सदानंद मोरे अकोला, मी रमाई बोलते एकांकिका कलाकार शिफा पवार, प्रबोधनकार सुभाष मानवटकर, गायत्री रामटेके, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक कवी गायक आनंद भगत यांनी केले होते. कार्यक्रमाचे संचालन प्रभाकर डोंगरे यांनी तर कार्यक्रमाचे आभार मधुकरराव बावलकर यांनी केले, यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव, गावातील नागरिक, गायक, कलावंत उपस्थित होते.



COMMENTS