अंबरनाथ नगरपरिषदे समोर रिपब्लिकन पक्षाचे उपोषण

HomeNewsनागपुर डिवीजन

अंबरनाथ नगरपरिषदे समोर रिपब्लिकन पक्षाचे उपोषण

गौतम नगरी चौफेर (राहुल हंडोरे अंबरनाथ) – दि. 3 मे 25 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या अंबरनाथ शाखेच्या वतीने स्थानिक प्रश्नासाठी अंबरनाथ शाखेचे संपर्क प्रमुख तेजस सरवदे हे तीन दिवसा पासून उपोषणास बसले होते. अंबरनाथ नगर परिषदेने सर्व मागण्या मान्य केल्याचे लेखी उत्तर दिल्यानंतर आज रिपब्लिकन पक्षाच्या वतीने उपोषण मागे घेण्यात आले.

अंबरनाथ मध्ये हिंदू स्मशान भूमितील विद्दूत शव दाहिणी बंद असल्यामुळे शव जाळण्यासाठी 3500/- रुपये घेतले जातात हे गरिबाला परवरडण्या सारखे नाही. गरिबाला मरणेही महाग झाले आहे. मेटलनगर हनुमान मंदिर परिसरातील सार्वजनिक सौचालय तोडण्यात आले असून बाजूला एक समाजमंदिर असतांना सौचालयच्या जागेवर दुसरे समाजमंदिर बांधणे प्रस्तावित आहे. या सौचालयाच्या जागेवर पुन्हा सौचालय बांधण्यात यावे, नाला अडवून अनधिकृत बांधकामं करण्यात आले आहे त्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते.

रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ नेते ठाणे प्रदेश अध्यक्ष आण्णासाहेब रोकडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्ठमंडळाने अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांची भेट घेऊन मागण्या संदर्भात सविस्तर चर्चा केली. शिष्ठमंडळात ठाणे ग्रामीण सरचिटणीस बाळासाहेब भालेराव, ठाणे प्रदेश सरचिटणीस श्याम शेवाळे, महाराष्ट्र राज्य सह सचिव राहुल हंडोरे, अंबरनाथ अध्यक्ष दिपक धनावडे, सरचिटणीस दिलिप जाधव, कार्याध्यक्ष बाळासाहेब खंडागळे, चिटणीस सुनील काकडे, उपाध्यक्ष जीवन शिंदे, तसेच कल्याणचे माजी नगरसेवक महादेव रायभोळे, उल्हासनगर महिला प्रतिनिधी आशा सोनवणे आदींचा समावेश होता.

शिष्टमंडळाशी चर्चा करताना मुख्याधिकारी गायकवाड म्हणाले की, स्मशान भूमितील विद्दूत शव दाहीनी सुरु करण्यात आली आहे. सार्वजनिक सौचालय का पाडले यांची चौकशी केली जाईल. तात्पुरते फिरते सौचालायची व्यवस्था केली जाईल.अनधिकृत बांधकामावर कारवाही केली जाईल असे शिष्टमंडळाला आश्वासन दिले. तसेच लेखी उत्तर दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

या प्रसंगी ठाणे प्रदेशचे कमालकर सूर्यवंशी, अंबरनाथ विधानसभा अध्यक्ष संतोष उबाळे, उल्हासनगर युवा नेता निलेश ढोके, महिला प्रतिनिधी मीना नगराळे, मीना बाविस्कर, स्मिता महाजन आदी. कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

COMMENTS