गौतम नगरी चौफेर(वंदना विनोद बरडे) – दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ ला नवजात शिशू सप्ताह साजरा करण्यात आला.हा कार्यक्रम दिनांक १५ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर पर्यंत विविध माध्यमांतून साजरा करण्यात आला. थिम. नवजात शिशू सुरक्षितता – प्रत्येक स्पर्शामध्ये, प्रत्येक वेळी, प्रत्येक बाळासाठी ही आहे. दिंनाक २१ नोव्हेंबर ला उद्घाटन व समारोपिय नवजात शिशू सुरक्षा सप्ताह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासाठी मंचावर उपस्थित डॉ प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधिक्षक, डॉ .प्रतिक गोजे बालरोगतज्ञ, वंदना विनोद बरडे अधीसेवीका हे होते. मान्यवरांचे पुष्प गुच्छ देवून स्वागत करण्यात आले. व परिचर देण्यात आला. मान्यवरांनी दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नवजात काळजी बाबत डॉ गोजे बालरोगतज्ञ यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. केअर काॅम्पियन प्रोग्राम अंतर्गत ब्रेस्ट माॅडैल, बेबी माॅडेल, फ्लीप चार्ट, जेवणाचे ताट,/थाळी माॅडेल, पाप्लेट वापरून वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी माहीती दिली.

नवजात बाळाचे हाताळणे, कांगारु मदर केअर विषयी पुनम केवट अप यांनी माहीती दिली. बाळाला आंघोळ व स्वच्छतेच्या योग्य पध्दती रत्नमाला ढोले यांनी माहिती दिली. मातांसाठी व कुटुंबासाठी मार्गदर्शन डॉ प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधिक्षक यांनी केले. नवजातातील धोक्याची लक्षणे, चिन्हे, स्वच्छता, चीन्हे संसर्ग प्रतिबंध किरणं वांढरे यांनी सांगितले. स्तनपानाचे फायदे लसिकरण समय सुची सतिस येडे आरोग्य सहाय्यक यांनी माहीती दिली. लाभार्थी यांनी मनोगत व्यक्त केले प्रश्न ऊत्तराचे सत्र घेण्यात आले आहेत. सूत्रसंचालंन गितांजली ढोक आहार तज्ञ यांनी केले व आभारप्रदर्शन व्रुशाली देहारकर अप यांनी केले. यामध्ये कुटुंबांनी सहभाग घेतला. राष्ट्रीय नवजात शिशु सुरक्षा सप्ताह तर केलाच गेला पण वर्षभर ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा येथे नियमित प्रसुती पुर्व व प्रसुती पश्चात व नवजात बालकांना नियमितपणे माहीती व जनजागृती पर सत्रे कार्यक्रम दररोज राबविण्यात येतात.

तसेच डायबेटिक, उच्चरक्तदाब, रक्तक्षय, काॅन्सर या सारख्या महत्वाच्या मूद्यावर सुद्धा दैनंदिन सत्रे घेऊन जनजागृती प्रचार व प्रसार केला जातो. यासाठी मेहनत वंदना विनोद बरडे अधीसेवीका, सतिस येडे आरोग्य सहाय्यक, गितांजली ढोक आहार तज्ञ, व्रुशाली देहारकर अप, पूनम केवट अप, किरणं वांढरे, रत्नमाला ढोले, लक्ष्मीकांत ताले, कुंदा मडावी, भारती, जयश्री ओमकार मडावी यांनी केली. वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी १०८ नंबर, बालसंस्कार, बालसंगोपन,, १८००८८९३६६९ केअर काॅम्पियन प्रोग्राम नंबर ची माहिती दिली


COMMENTS