शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग भेट देऊन साजरा केला वाढदिवस.

HomeNewsनागपुर डिवीजन

शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग भेट देऊन साजरा केला वाढदिवस.

– सेवानिवृत्त शिक्षक चंद्रप्रकाश बुटले यांचा ५९ वा वाढदिवस साजरा.
गौतम नगरी चौफेर //बादल बेले राजुरा २ जुलै राजुरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथून सेवानिवृत्त झालेले पदवीधर माध्यमिक शिक्षक चंद्रप्रकाश कर्णुजी बुटले यांनी आपला ५९ वा वाढदिवस तोहोगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थांना स्कूल बॅग भेट देऊन साजरा केला.
यावेळी सौ.शोभाताई चंद्रप्रकाश बुटले  यांची उपस्थिती होती. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचगांव, केंद्र व बीट – तोहोगांव  शाळेतील सर्व मुलांना स्कुलबॅग  व मिठाईचे वाटप केले. कार्यक्रमला शाळा सुधार समितीच्या अध्यक्षा सौ.जयश्रीताई आत्राम , पोलिस पाटील पाचगांव, शाळा सुधार समितीच्या उपाध्यक्षा सौ.सपनाताई कुबडे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शर्मिला ताई झाडे  तसेच गावातील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक विठोबा पाटील मोरे, भास्कर पा. मोरे, पुष्पक कुबडे, राजू मोरे, शाळेचे सहा. शिक्षक प्रमोद उरकुडे यांचीही विशेष उपस्थित होती. विशेष बाब म्हणजे शाळेचे सर्व विद्यार्थी शालेय गणवेशात शंभर टक्के उपस्थित होते. शाळेच्या बोलक्या भिंती व वर्गखोल्यात शैक्षणिक साहित्य, शाळेचा स्वच्छ आणि सुंदर परीसर सर्वांचे मनमोहून घेतं होता. कार्यक्रमाचे  सुत्रसंचालन  प्रमोद उरकुडे यांनी केले तर आभार शिक्षीका झाडे  यांनी मानले.

आपली सेवा जिल्हा परिषदेच्या शाळेत झाल्याने त्या विद्यार्थ्यांकरिता आपणं काहीतरी केले पाहिजे अशी भावना मनाशी बाळगून बुटले यांनी सामाजिक दायित्व जोपासले. सांस्कृतिक, क्रिडा स्पर्धा याची आवड असल्यानं नेहमीच विद्यार्थांना आर्थिक, बौद्धिक, क्रिडा मार्गदर्शन, शैक्षणिक साहित्य भेट देऊन त्यांना प्रोत्साहित करीत असतात.

COMMENTS

You cannot copy content of this page