गौतम नगरी चौफेर – अर्पित वाहाणे वर्धा जिल्हा प्रतिनिधी वर्धा नागपूर विशेषतः केंद्राच्या त्वचा विभागामध्ये कुष्ठरोग जागरूकता शिबिराचे भव्य सकाळी 11 वाजता आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान डॉक्टर वैशाली व्यवहारे मॅडम, वैद्यकीय अधीक्षक, राज्य कामगार विमा रुग्णालय, सोमवारी पेठ, नागपूर यांनी भूषविले. तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किशोर गिरी, विशेषज्ञ केंद्रप्रमुख डॉक्टर भावना चौधरी मॅडम, आरोग्य शिबिराचे मुख्य आयोजक डॉक्टर हर्षवर्धन कांबळे आणि विमा रुग्णालय नागपूरच्या त्वचा विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर नेहा धोपा मॅडम तसेच डॉक्टर आदित्य परीहार, डॉक्टर अभिलाष गेडाम, डॉक्टर फैजान खान, डॉक्टर शिल्पा नलगुंडवार, आदी उपस्थित होते. धीरज ढोके, सोनू कश्यप, शुभम राऊत, विनोद वाल्मिकी, कुणाल वंजारी, फर्जना खान, आदींनी या कार्यक्रमाच्या यशस्वी ते साठी विशेष प्रयत्न केलेत. याप्रसंगी डॉक्टर नेहा धुपा यांनी कुष्ठरोगाविषयी संपूर्ण माहिती दिली.

कुष्ठरोगाचे लक्षण, निदान आणि उपचार याविषयी त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने माहिती प्रदान केली. डॉक्टर वैशाली व्यवहारे मॅडम वैद्यकीय अधीक्षक यांनी त्वचा रोगाच्या संबंधाने राज्य कामगार विमा योजनेमध्ये असलेल्या सेवा आणि सोयीच्या संदर्भात मार्गदर्शन केले. देवकन्या कावळे यांनी उपस्थित सर्वांना कुष्ठरोग निवारणासंबंधी शपथ दिली. उपस्थित रुग्णांना कुष्ठरोगाविषयी माहितीपत्रके वाटण्यात आली. संगणकावरती कुष्ठरोगाविषयी माहितीपट दाखविण्यात आला. जनजागृतीसाठी म्हणून रुग्णालयातील सर्व डिजिटल डिस्प्लेवरती कुष्ठरोगांविषयी माहिती देण्यात आली. याप्रसंगी रुग्णांनी शिबिराविषयी अत्यंत समाधान व्यक्त करत कुष्ठरोगाविषयी काही प्रश्न विचारले, त्याचे उत्तर डॉक्टर नेहा धोपा मॅडम यांनी दिलेत. याप्रसंगी उपस्थित असलेल्या विमेदार व त्यांच्या कुटुंबीयांना कुष्ठरोगाच्या विषयीची माहिती देऊन, त्यांची तपासणी करण्यात आली. एकूण 65 रुग्णांनी या शिबिरामध्ये सहभाग घेतला.


COMMENTS