गौतम नगरी चौफेर श्रीकृष्ण देशभ्रतार नागपूर :- बुद्धिस्ट समन्वय संघ, महाराष्ट्र आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ऑगस्ट २०२५ रोजी नागपूर शहरातील कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग नागपूर येथे दुपारी १२ वाजता महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन तथा बीटी अॅक्ट १९४९ रद्द करणे या प्रमुख मागणीसाठी भंते विनाचार्य यांचा जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. कार्यक्रमात पूज्य भंते रेवत संघनायक, इंडिया, पूज्य भंते उपगुप्त कार्याध्यक्ष, भारतीय भिक्षसंघ महाराष्ट्र राज्य, कार्यकारी अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा भीमराव आंबेडकर, पूज्य भदंत ज्ञानज्योती, भंते हर्षबोधी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमांमध्ये विशेष अतिथी म्हणून सिने अभिनेता हिमांश सोनी, (ज्यांनी झी टिव्ही चैनल वर भगवान बुद्धांची भूमिका साकारली आहे.) आमंत्रित करण्यात आले आहे. भंते विनाचार्य यांना मागील अनेक दिवसापासून बिहार सरकारने जेरबंद केलेले होते. हे जवळपास ६३ दिवस तुरुंगात होते.
बिहार तुरुंगातून सुटका झाल्याच्या नंतर ते पहिल्यांदाच महाराष्ट्रात सिने अभिनेता हिमांशू सोनी राहणार प्रमुख अतिथी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या लढा पुन्हा नव्याने उभा करण्यासाठी येत आहेत. ही जनसंवाद यात्रा महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये जाणार आहे. ही यात्रा जवळपास ३८ दिवसांची असून प्रत्येक जिल्ह्यांमध्ये भव्य प्रमाणावर मोठी जनसभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते, कार्यरत आहेत. संवाद यात्रेचे समारोप येणाऱ्याधम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पावन पर्वावर करण्यात येणार आहे. सदर माहिती कार्यक्रमाचे निमंत्रक नितीन गजभिये यांना दिली आहे. यशस्वीतेसाठी राकेश धारगावे, विलास मेश्राम, योगेश राऊत, राजू शेंडे, मुकेश मेश्राम, शितल मूल, सतीश गजभिये, बबलू नितनवरे, रिकेश मोटघरे, संघपाल उपरे, मुकेश मेश्राम आदीं परिश्रम घेत आहेत.


COMMENTS