मुंबई येथील मराठी पत्रकार भवनात आरक्षणवादी आघाडीची घोषणा
गौतम नगरी चौफेर (मुंबई (संजीव भांबोरे) – आज दिनांक 25 ऑक्टोबर 2024 ला सायंकाळी 4 वाजता मुंबई येथील मराठी पत्रकार भवनात विविध गटात विखुरलेल्या आंबेडकरी विचारधारेच्या नेत्यांनी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेऊन आरक्षणवादी आघाडीची घोषणा केली. मागील चार महिन्यापासून विविध गटात विखुरलेल्या आंबेडकर नेत्यांनी एकत्र यावे याकरिता भंडारा येथील रिपब्लिकन एकीकृत समितीने पुढाकार घेतला होता व नागपूर, मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन सर्व गटात विखुरलेल्या आंबेडकर विचारधारेच्या नेत्यांनी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद नागपूर येथील संयुक्त रिपब्लिकन आघाडीने दिला. व त्याचा परिणाम आज आंबेडकर विचारधारेच्या नेत्यांना एकत्र येण्यास भाग पाडले व त्यामुळेच मुंबई येथील मराठी पत्रकार भवनात संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आरक्षणवादी आघाडीची घोषणा करण्यात आली. व संपूर्ण महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागा लढविण्याचे ठरविण्यात आले. छत्रपती शिवराय, फुले, शाहू व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रगत व पुरोगामी महाराष्ट्रात भारतीय संविधान संविधात्मक आरक्षण धोरणाचे स्वार्थी व पोट बॅकपोटी राज्य विधानसभा निवडणुकीत भाजपा प्रणित महायुतीतर्फे व काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी तर्फे दिशाहीन सध्या सोयऱ्यांच्या हिताचे सत्ताकारक केले जात असून पुरोगामी महाराष्ट्रात महायुती व महाआघाडीच्या दर्जाहीन व जनतेच्या हिताविरुद्धचे जातीय संघर्षाचे राजकारण केले जात असून अश्या दृश्य व अदृश्य जातीयवादी व बहुजन विरोधी दोन्ही आघाडीतील उमेदवारांना राज्यातील मतदारांनी पराभूत करावे व संविधान वादी आरक्षणवादी महाआघाडीला राज्यात सत्ता द्यावी असे राज्यातील बारा कोटी जनतेला आरक्षणवादी आघाडीने आव्हान केले आहे .
महाराष्ट्रातील ही विधानसभा निवडणूक संविधान, लोकतंत्र बचाव या मुद्यांची केंद्रभूत नसून राज्यात जातीवादी भूमिकेतून आरक्षण सारख्या संविधात्मक धोरणाला जातीय विद्वेष व राजकीय ध्रुवीकरणासाठी महायुती व आघाडीतर्फे गैरवापर करून महाराष्ट्रात जातीय संघर्षाचा ज्वालामुखी पेटविण्यासाठी मराठा विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध आदिवासी, अनुसूचित जाती जमातीचे उपवर्गीकरण, आदिवासी यांचे डिलीस्टिंग आदिवासींना गैर आदिवासी ठरविणे, एक संघ ओबीसींचे आरक्षण नावाखाली तुकडे करणे, मुस्लिमांचे पाच टक्के शैक्षणिक आरक्षण नाकारणे, असे उच्च जाती केंद्र सत्ता करणारा पराभूत करण्यासाठी व संविधात्मक आरक्षण धोरण व याद्वारे जिसकी जितनी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी या सामाजिक व आर्थिक लोकशाहीचा पाया असणाऱ्या संविधान वादी धोरणांच्या विजयासाठी आरक्षणवादी आघाडी राज्यात विधानसभेच्या सर्व जागांवर निवडणूक लढविणार आहे .
राज्यातील प्रस्थापित ६ राजकीय पक्षांनी महाराष्ट्राचे अतोनात नुकसान केल्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, सरकारी कर्मचारी व लाखो बेरोजगार युवा हे भविष्याच्या चिंतेत असून राज्यात महाविकास आघाडी व महायुतीच्या भ्रष्ट घराणेशाहीप्रधान व जातीयवादी राजकारणाने राज्याला आर्थिक कर्जदार केले असून सरकारच्या आर्थिक उधळपट्टीमुळे जनतेच्या विविध कल्याणकारी योजनांना कात्री लावली असून राज्यात उधळणपट्टी द्वारे कर्जबाजारी केल्या जात आहे.
राज्यात सध्या आघाडी व युतीमध्ये घरानेशाहीचे पक्षांतराचे आयाराम गयाराम सर्व सुरू असून कोण सेक्युलर व कोण संघवादी हा जनतेच्या समोरच्या प्रश्न आहे .तर आजच्या उद्या संघ शाखेत जाणार नाही तर संघवाला जातीवादी सत्तेसाठी आघाडी सोबत राजकीय हनिमून करणार नाही याची हमी राज्यातील आघाडी युती नेते देऊ शकत नाही तर विशिष्ट भांडवलदाराची ही जपण्यासाठी व राज्यातील जल, जमीन, जंगल व इतर संसाधने भ्रष्टाचारी उद्योगपतीच्या घशात घालण्यासाठी हे आघाडी व युतीवाले नेते पक्ष एकत्र होणार नाहीत याची हमी कोणी देऊ शकत नसल्यामुळे राज्यघटना विरोधी जातीयवादी भ्रष्टाचारी घराणेशाहीची मक्तेदारी मिरवणारी चुकीची आर्थिक व सामाजिक धोरणे शिक्षण रोजगार धोरणे राबविणाऱ्या प्रस्थापितांच्या राजकारणाला पराभूत करून सुसंस्कृत सर्व समाज घटकांच्या विकासाच्या राजकारणासाठी व संविधात्मक आरक्षण धोरणाच्या संवर्धनासाठी राज्यातील जनता आरक्षणवादी आघाडी प्रचंड बहुमताने निवडून देईल असा आम्हाला ठाम विश्वास आहे.
आघाडीचा 15 कार्यक्रम विधानसभा निवडणुकीचा संक्षिप्त जाहीरनामा आजच्या पत्रकार परिषदेत आम्ही प्रकाशित करीत आहोत. या पत्रकार परिषदेला प्रकाश बापू शेंडगे ओबीसी बहुजन आघाडी, मा आनंदराज आंबेडकर रिपब्लिकन सेना अध्यक्ष ,अँड डॉ सुरेश माने बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, मा.वामन मेश्राम बहुजन मुक्ती पार्टी, फिरोज महसूलदार मुस्लिम सेवा संघ अध्यक्ष, संजय कोकरे ओबीसी एनटी पार्टी अध्यक्ष, भगवान बोराडे धनवास भारत पार्टी, सय्यद आबिद पिस पार्टी मुंबई, मेघनाथ गवळी भारतीय ट्रायबल पार्टी, अशोकराव आल्हाट जनहित लोकशाही पार्टी, अँड अल्ताफ इंडियन नॅशनल लीग महाराष्ट्र, अँड अल्ताफ इंडियन नॅशनल महाराष्ट्र, चंद्रशेखर टेंभुर्णे रिपब्लिकन एकीकरण समिती व इतर सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक संघटना यांनी एका पत्रकाद्वारे केलेली आहे.
COMMENTS