प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा जागृतपणा
सीईओ मंगेश वासेकर व स्वच्छता पाणीपुरवठा अभियंता संतोष दोंतूलवार यांनी केली संयुक्त कारवाई.
गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा) – साकोली शहरातील नवनिर्माण तलाव सौंदर्य निसर्गरम्य ठिकाणी मागील रविवारी एका “कचरासेठ” भाजी विक्रेताने चक्क सौंदर्य बालोद्यान टाईल्सवर गाडी लाऊन तेथेच सडका भाजीपाला फेकून पोबारा केला होता. तर एक महिन्यापूर्वी असेच एका “कचरासेठ” इलेक्ट्रॉनिक दूकानदाराने याच सौंदर्य स्थळावर टाकावू घातक थर्माकोलचा भरपूर प्रमाणात कचरा आणून टाकला होता. दोन्ही घटनेत महाराष्ट्र शासन मान्य प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या जागृत मिडिया पत्रकार रवि भोंगाणे व किशोर बावणे यांनी त्यांची थेट छायाचित्रे काढून “साकोली मिडीया” वर जनहितार्थ व प्रशासनाला कळवित नगरपरिषदेने या बेजबाबदार लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. ही अतिशय गंभीर बाब व शहाराला गलिच्छ करणारा प्रकार वृत्त माध्यमातून येताच येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांनी तातडीने दखल घेतली. आणि येथील पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता संतोष दोंतूलवार यांच्या संयुक्त विद्यमाने आज शनिवार २८ जूनला त्या बेजबाबदार भाजी विक्रेता एम एच ३६ एए २५३३ “रिषभ दि गड्डी” या टेम्पोचा शोध घेऊन त्यावर अखेर १ हजार ५०० रूपयाची दंडात्मक व एक्शन कारवाई केली. दूसरीकडे थर्माकोलचा भरपूर प्रमाणात कचरा टाकणारे परीसरातील एका इलेक्ट्रॉनिक व्यावसायिकावर सुद्धा २ हजार रुपयाची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी सदर वृत्त हे महाराष्ट्र शासन मान्य प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने, स्थानिक जागृत पत्रकारांनी तातडीने उचलले. कारण यात मागणी ही होती की, “अश्यांना असेच सोडून दिले तर असे बेजबाबदार व शहराला गलिच्छ करण्याचे प्रकार वारंवार होऊ नये” म्हणूनच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश वासेकर सर यांनी ह्यांवर कारवाई कराच..! ही रोखठोक मागणी होती. त्यातच हा गंभीर प्रकार लक्षात घेऊन कर्तव्यदक्ष सीओ मंगेश वासेकर आणि स्वच्छता अभियंता संतोष दोंतूलवार यांनी आज ही धडक कारवाई केली हे विशेष. या सुरू असलेल्या “मेक स्मार्ट ग्रीन साकोली” मोहिमेसाठी येथील व्हीआयपी ग्रुपचे संचालक अनिल कापगते, आशिष चेडगे, पत्रकार रवि भोंगाणे, सामाजिक कार्यकर्ता महेश पोगळे, फ्रिडम युथ फाऊंडेशन अध्यक्ष किशोर बावणे, पत्रकार ऋग्वेद येवले हे सदैव प्रयत्नशील आहेत. यामध्ये सर्व जागृत जनतेने नगरपरिषद मुख्याधिकारी मंगेश वासेकर व अभियंता संतोष दोंतूलवार यांचे ही दंडात्मक कारवाई केल्याबद्दल आभार मानले आहे.

COMMENTS