आदिवासी गोंड समाज संघटना तर्फे क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांची जयंती उत्साहात साजरी

HomeNewsनागपुर डिवीजन

आदिवासी गोंड समाज संघटना तर्फे क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांची जयंती उत्साहात साजरी

गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) – बिगर सातबारा शेतकरी संघटना यांच्या वतीने आदिवासी गोंड समाज संघटना तर्फे क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त समीक्षा व संशोधन परिषद घेण्यात आली. त्या सभेचे आयोजक व संस्थापक भाई जगदीश कुमार इंगळे, सत्कारमूर्ती महाराष्ट्रातील पहिल्या उद्योजिका वंदना लोणे तसेच कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष मनीषाताई भांडारकर महिला अधिकार सामाजिक संघटना कार्याध्यक्ष, उद्घाटन पाहुणे म्हणून लाभलेले , महिला अधिकार सामाजिक संघटनेचे भंडारा जिल्हा अध्यक्ष शितल अतूल नागदेवे, प्रवक्ता महिला सामाजिक संघटना, शितल गेडाम, तसेच प्रमुख अतिथी म्हणून माणिकराव शेडमाके तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महिला अधिकार सामाजिक संघटने गोंदिया जिल्ह्याचे अध्यक्ष मनिषा खोब्रागडे, तालुका अध्यक्ष वैशाली सुरपाम, तुमसर तालुकाध्यक्ष काशीराम ठाकरे, तालुका सचिव राजेश बावणे, डॉक्टर सुखदेव कांबळे संस्थापक शेतकरी संघटना इंदिरा बोंद्रे शेतकरी संघटना अध्यक्ष इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला सर्व मान्यवरांनी बाबुराव शेडबाके यांच्या जीवनावर प्रकाश टाकून महिलांच्या संघटन व त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत असेल त्यावर कसा आंदोलन केला पाहिजे, लढा दिला पाहिजे याविषयी सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार मनीषा खोब्रागडे यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने आदिवाशी बांधव उपस्थित होते.

COMMENTS