दिवाळी दरम्यान होणा-या वस्तु वाटपावर लक्ष ठेवा खर्च निरीक्षक श्री.अनिरूध्द
गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) – 20 नोव्हेंबर रोजी होणा-या विधानसभा निवडणुकीसाठी दिवाळी प्रित्यर्थ स्नेह भेटीच्या नावाखाली पैसे, मदय तसेच मोफत वस्तु वाटप होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यासाठी भरारी पथकांनी सतर्क राहून या बाबींवर लक्ष ठेवावे तसेच निवडणुका हया कोणत्याही प्रभावाखाली न होता, निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी निवडणुकीत नियुक्त सर्व यंत्रणांनी खर्च पथकाला वेळोवेळी माहिती दयावी व अवगत करावे, असे निर्देश खर्च निरीक्षक श्री. अनिरूध्द यांनी आज निवडणुक यंत्रणेला दिले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलते, पोलीस अधिक्षक नुरूल हसन, उपजिल्हाधिकारी निवडणुक प्रशांत पिसाळ, उपवनसंरक्षक राहूल गवई, नोडल अधिकारी आचारसंहीता कक्ष कमलाकर ि रणदिवे,राज्य सेवा व वस्तु कर सहआयुक्त मंगेश काटे, आयकर विभागाचे अधिकारी, खर्च पथक प्रमुख सोनल एन्डोळे, जिल्हा माहिती अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे युवराज राठोड, अग्रणी बॅक व्यवस्थापक गणेश तईकर, निवडणुक निर्णय अधिकारी भंडारा, साकोली, तुमसर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलते यांनी जिल्हयाच्या विधानसभा पुर्वतयारीचे सादरीकरण यावेळी केले. यावेळी पेालीस विभागाने आतापर्यत 20 लाख रू किमतीचे मदय व मदय तयार करण्याची सामुग्री जप्त केल्याची माहिती पोलीस अधिक्षक श्री.हसन यांनी दिली. जिल्हयात एफएसटी 13,एसएसटी 11 व्हीएसटी, 11 व्हीव्हीटी 3 पथके गठीत असून त्याव्दारे नियंत्रण सुरू आहे. संशयास्पद बॅक व्यवहारांवर लक्ष ठेवण्याचे तसेच दहा लाखांच्या वरील व्यवहारांबाबत कारवाई करण्याबाबतच्या सूचना श्री.अनिरूध्द यांनी यावेळी आयकर विभागाला दिली.
निर्भय व निष्पक्ष वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, परवानग्यासाठी सुविधा ॲप,तसेच तक्रारीसाठी सि-व्हिजील ॲपव्दारे काम करावे. खर्च निरीक्षक चमुतील नियुकत कर्मचारी अधिकाऱ्यांचे प्रशीक्षण झाले नसल्यास पुन्हा प्रशिक्षण करण्यात यावे,तसेच खर्च कामाबाबत आयोगाच्या सुचनानुसार लेखे तपासणी करण्याचे निर्देश श्री.अनिरूध्द यांनी दिले.
COMMENTS