श्रीलंका येथील भंतेजी शिवली बोधी
गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – लाखनी येथील महाप्रज्ञा बुद्ध विहार येथे मार्गदर्शन करताना शिवली बोधी श्रीलंका येथील परमपूज्य भंतेजी म्हणाले की समाधी, संबोधी आणि सदाचार हेच बौद्ध धम्माच्या कुशल कर्माचे अधिष्ठान असल्याचे सांगितले, पुढे ते म्हणाले की बौद्ध धर्म हा शाक्य कुलोत्पन्न तथागत गौतम बुद्ध यांनी स्थापन केला. मानवी जीवन सुखकर बनविण्यासाठी जो मध्यम मार्ग सांगितला नीतिमान जीवन जगण्यासाठी जी आचार संहिता सांगितली ती म्हणजे धम्म होय. तथागतांनी सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी वाराणसी जवळ सारनाथ येथील मनोगतय वनात सुरुवातीस त्यांची विरोधक असलेल्या पंचवर्गीय मन परिवर्तन करून त्यांच्यासमोर जे धम्मचक्र प्रवर्तन केले तेव्हापासून अव्याहतपणे बौद्ध धम्म पुढे संपूर्ण भारतभर आणि भारताबाहेरही पसरला आणि सर्वोच्च स्तरावरील लोकांनी त्यांचा उत्स्फूर्तपणे अंगीकार केला. बुद्ध ही व्यक्ती पूजत नव्हते अत्त दीप भव म्हणजे स्वयंप्रकाशित होऊन स्वतःच मार्ग अंगी करा असा त्यांनी उद्घोष केला धम्मामध्ये स्वर्ग, नरक, कर्मकांड, अंधश्रद्धा, पापपुण्य, नवस यांना थारा नाही बुद्धांनी आपले तत्वज्ञान हे पाली या भाषेतून लोकांना सांगितले हे तत्त्वज्ञान सोपे होते. यात कुठलाही अतिरेक नसून बुद्धांनी लोकांना मध्यम मार्ग सांगितला. याप्रसंगी सूत्रसंचालन गजेंद्र गजभिये आणि आभार डॉ रेवाराम खोब्रागडे यांनी केले. यावेळी सदानंद वासनिक, नामदेव कानेकर, युवराज भालाधारे जयंद्र मेश्राम, आशिष गणवीर, प्रज्ञा मेश्राम, सुमन कानेकर, साधना शिंगाडे, कमल गणवीर, सुमन राजवाडे, विना डोंगरे, विद्या डोंगरे,सीमा उके, शीला कोटांगले, रूपा रामटेके, संगीता तिरपुडे, मीरा रामटेके, ज्योती भैसारे, अस्मिता पाटील, सायली ढवळे आणि शेकडो महिला उपस्थित होत्या.



COMMENTS