HomeNewsकोंकण डिवीजन

संविधान हक्क परिषद महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी राहुल हंडोरे यांची निवड

गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी मुंबई) – भारतीय संविधानाने दिलेले हक्क व अधिकार याची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच माणसाच्या मूलभूत हक्कासाठी लढा देणाऱ्या संविधान हक्क परिषद संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी जेष्ठ समाजसेवक, पत्रकार राहुल हंडोरे यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माजी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांची राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड झाली आहे तर डॉ शहाबुद्धिन शेख यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. पत्रकार राजू गायकवाड यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष, तर शंकर कांबळे यांची राष्ट्रीय कोषाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.

ऍंड. विजय पवार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, नंदिनीताई साळवे महिला प्रदेश अध्यक्षा, शोभाताई जाधव ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा तर विनिता वाघ  यांची ठाणे जिल्हा सचिव पदी निवड झाली आहे. नियुक्ती पत्रकावर संविधान हक्क परिषदेचे संस्थापक मंत्रालय वार्ताचे संपादक अनिल अहिरे तसेच बाळ भीमराव चित्रपटाच्या निर्मात्या महागायिका निशाताई भगत यांच्या सह्या आहेत.

COMMENTS