गौतम नगरी चौफेर //गौतम धोटे // चंद्रपूर येथील रिपाईच्या वतीने lजिल्हाध्यक्ष गौतम तोडे यांनी केले रॅलीचे नेतृत्व चंद्रपूर केन्द्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री यांच्या सुचनेच्या अनुषंगाने आज गुरुवारी भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने चंद्रपूर शहरात भारत जिंदाबाद यात्रा आणि तिरंगा सन्मान रॅलीचे जिल्हाध्यक्ष गौतम तोडे यांच्या नेतृत्वात आयोजन करण्यात आले होते.
ही रॅली शहराच्या मुख्य मार्गावर असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून दुपारी 12वाजता निघाली . आयोजित रॅलीत पार्टीचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येंने सहभागी झाले होते. रामदासजी आठवले आगे बढो ,हम तुम्हारे साथ है! ,पी .ओ.के.भारतात आणा,भारत जिंदाबाद , एक राष्ट्र एक तिरंगा,हर दिल मे तिरंगा, बौद्ध गया येथील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे अश्या विविध घोषणा देत सदरहु रॅली चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहचली.अर्थात आजच्या भारत जिंदाबाद यात्रेतून देशभक्तीचा संदेश देण्यात आला.
एका शिष्टमंडळाने दुपारी तीन वाजता चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती,भारताचे पंतप्रधान व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना एक लेखी निवेदन सादर केले.
रॅलीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) पक्षाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गौतम तोडे, विदर्भ प्रदेश महासचिव अशोक घोटेकर, महिला जिल्हाध्यक्षा किरण गेडाम,तालूकाध्यक्ष हंसराज वनकर,शहर महासचिव संदीप जंगम, महिला शहराध्यक्ष अश्विनी रायपूरे, तालूकाध्यक्ष प्रभाकर खाडे, नागसेन डांगे, शैलेश राखडे, गीता साखरे, सुप्रसिल गेडाम, राहूल मुन, प्रविण डोर्लिकर,धर्मेश नागदेवते जयप्रकाश कांबळे यांच्यासह पार्टीचे असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.


COMMENTS