शामादादा कोलाम ब्रिगेडच्या प्रदेश अध्यक्षा सौ इंदिरा बोंदरे यांनी केली राज्य परिवहन विभागाकडे निवेदनातून मागणी
गौतम नगरी चौफेर (राजेश येसेकर भद्रावती तालुका प्रतिनिधी भद्रावती) : सणासुदीच्या दिवसांत बसमध्ये प्रवाश्याच्या गर्दीमध्ये महीलांसहित अपंगावर अन्याय होत असल्याच्याघटणा वाढत असल्यामुळे संघटनेच्या वतीने पांढरकवडा – राज्य परिवहन विभागाकडून प्रवाशांच्या हितासाठी सोई सुविधांसाठी उपाय योजना राबविल्या जातात परंतु त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळत नाहीं त्याचाच भाग म्हणून बसमध्ये प्रवास करणाऱ्या पैकी काही राखीव महिलांसाठी तर काही अपंग व्यक्ती साठी काही जेष्ठ नागरिकांसाठी पत्रकार या करीता राखीव जागांची व्यवस्था केलेली असताना त्याचा लाभ त्या व्यक्तींना मिळत नसून त्या जागेवर इतर प्रवासी बसून लाभ घेतात सणासुदीच्या काळात महिला अपंग जेष्ठ नागरिक हे मोठया प्रमाणात प्रवास करतात महिलांच्या राखीव जागेवर पुरूष बसलेले असताना महिला जर बसण्यासाठी विनंती करत असेल तर पुरूष मंडळी आरेराविची भाषा वापरतात अपंग व्यक्तींच्या बाबतीत सुद्धा असेच प्रकार घडत असून मोठया प्रमाणात वाद होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे राज्य परिवहन विभगाकडून तात्काळ निर्देश जारी करुन बस मध्ये पत्रक चीपकवून महिला, अपंग, जेष्ठ नागरिक पत्रकार यांच्या मध्ये जन जागृती करावी जेणे करुन बसमध्ये प्रवास करताना महिला, अपंग, जेष्ठ नागरिक व्यक्तींना सोईस्कर प्रवास करणे सोईचे होईल असे निवेदनात शामादादा कोलाम ब्रिगेडच्या प्रदेश अध्यक्षा सौ इंदिरा बोंदरे यांनी नमूद केले आहे.
बस मध्ये प्रवास करताना काही प्रवासी खिडकीतून हात रुमाल, बॅग किंवा काही वस्तू ठेऊन आपली जागा निश्चित करतात परंतु गर्दीचा सामना करून बस मध्ये चडताता परंतु रिकाम्या जागेवर वस्तू असल्यामुळे त्या जागेवर बसू शकत नाहीं त्या मध्ये अपंग, महिला, जेष्ठ नागरिक यांच्या राखीव जागा असली तरी त्या व्यक्तीला जागेवर बसू दिल्या जात नाही अश्या अनेक घटना घडत आहेत त्यावर कुणाचे नियंत्रण नाही तर त्याची दखल घ्यावी म्हणून निवेदन सादर केले असल्याची प्रतिक्रिया शामादादा कोलाम ब्रिगेडच्या प्रदेश अध्यक्षा सौ इंदिरा बोंदरे यांनी दिली आहे.
COMMENTS