साखरी (वा.) येथे संघर्ष युवा विकास मंडळ च्या रौप्य महोत्सव वर्षपूर्ती निमित्याने भव्य जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन.

HomeNewsनागपुर डिवीजन

साखरी (वा.) येथे संघर्ष युवा विकास मंडळ च्या रौप्य महोत्सव वर्षपूर्ती निमित्याने भव्य जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन.

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा – पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते झाले उद्घाटन.
– शारीरिक, बौद्धिक विकासासोबतच सुदृढ आरोग्यासाठी खेळ आवश्यक.- हंसराज अहिर
राजुरा २ फेब्रुवारी  संघर्ष युवा विकास मंडळ साखरी (वा) यांच्या रौप्य महोत्सव वर्षपूर्ती निमित्याने जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव तसेच साखरी वाघोबा खुले टेनिस बॉल क्रिकेट,  कबड्डी स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते संपन्न झाले. छत्रपती शिवाजी स्टेडियम, साखरी येथे दिनांक ३१ जानेवारी रोजी उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दत्ताजी म्हसे महाराज यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून  उदय ब्राम्हणे खान प्रबंधक, पोवनी एक्स ओसिएम, डॉ. एस. एम. वरकड, प्राचार्य, शिवाजी महाविद्यालय राजुरा, डॉ. राजेश खेराणी, उप प्राचार्य, शिवाजी महाविद्यालय राजुरा, कु.प्रणाली ताई मडावी,सरपंच, धर्मराज उरकुडे, पोलीस पाटील, अंकुश गोरे, अध्यक्ष तंटा मुक्ती समिती, मोहितकर सर, मुख्याध्यापक, जी.प., बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, संघर्ष युवा विकास मंडळाचे अध्यक्ष राजू घरोटे यांची  उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक इंजि. ॲड. प्रशांत घरोटे यांनी केले. तर आभार उत्तम बोबडे यांनी मानले.  क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या आयोजना करीता  संघर्ष युवा विकास मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि क्रिकेट, कबड्डी व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन समिती सर्व पदाधिकारी, सुदर्शन बोबडे, प्रमोद  निमकर, अमोल डेरकर, चंद्रकांत लेडांगे, मिथुन काटवले, राहुल उरकुडे, अनिल गोरे, अमित निमकर, राकेश उरकुडे, रामकिसन ताजने, मारोती नवरखेडे, दुर्गेश लांडे, अमोल गोरे, सुरज गोरे, महेश मडावी, अंकुश अडबाले, ध्न्यानेश्वर गरुडे, अमोल अडबाले, सचिन मिलमीले, अक्षय जेणेकर,प्रमोद रंभाजी आदींनि अथक परिश्रम घेतले. राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर, घुगुस, साखरी, वरोडा, धीडशी, गोवरी परिसरातील २० संघानी सांस्कृतिक स्पर्धेत सहभाग घेतला.

——————————————–
*विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी  करणाऱ्यांचा केला  सत्कार*
आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त ग्रामसेवक कुशाबराव मानपल्ललीवार यांचा, राज्यस्तरीय शालेय कुस्ती खेळातील विद्यार्थी वेदांत मंगेश थेरे, जिल्हा स्तरावर शालेय कुस्ती स्पर्धेत सहभागी प्रतिक प्रशांत घरोटे खेळाडू, पर्यावरण क्षेत्रातील भरीव कामगिरी करणाऱ्या बादल बेले आदींचा मान्यवरांच्या हस्ते शॉल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला. तसेच ८५ वर्षाचे ज्येष्ठ नागरिक सीताराम पाटील उरकुडे यांचाही सत्कार करण्यात आला.
——————————————–
*कोट*.
हंसराज अहिर, पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री
   साखरी वाघोबा सारख्या वेकोली अधिग्रहित गावात संघर्ष युवा विकास मंडळाचे पंचवीस वर्षापासून सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य तपासणी व रोग निदान शिबिर, स्वयंरोजगार व लघू उद्योग कार्यशाळा, गावातील विकासाचे कार्य अशा सर्वांगाने सातत्याने कार्य करणाऱ्या मंडळाचे अभिनंदन करीत कौतुक केले. मानवाला शारीरिक बौद्धिक विकासासोबतच सुदृढ आरोग्यासाठी खेळ आवश्यक आहे असे प्रतिपादन हंसराज अहिर यांनी केले.
——————————————–

COMMENTS

You cannot copy content of this page