गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी आवारपूर) – कोरपना पासून उत्तरेकडे ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोडशी ग्रामपंचायत मधील गांधीनगर गांवात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. एकूण १५० घरांची वस्ती असलेल्या जवळपास ६०० लोकसंख्येच्या या छोट्याशा गांवात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा भव्य असा पुतळा गांवाच्या सुरवातीला बसविला आहे तर गांवाच्या मधोमध महात्मा गांधीजी यांचा पुतळा लावण्यात आला आहेत ,विविध जाती-धर्माने नटलेल्या या गांवात नेहमी सार्वजनिक कार्यक्रमाला सर्व गांवकरी एकत्र येतात व सहयोग करतात ।
गेल्या १२ वर्षांपासून गांधीनगर गांवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी केली जाते या वेळेस पुण्यतिथी साजरी करताना रक्तदान शिबीर यांचे आयोजन करण्यात आलेत तर कीर्तन ,सामुदायिक भजन ,प्रबोधन पर भाषण ,सामुदायिक ध्यान पाठ ,सामुदायिक पार्थना ,गांवात प्रभातफेरी व सर्व गांवातील तसेच बाहेर गावुन आलेल्या लोंकाच्या उत्तम अशी भोजनाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती.
जवळपास १५०० लोकांची उपस्थिती या कार्यक्रमाला होती ,यात वृद्ध महिला -पुरुष पासून ते गांवातील नौजवान सुद्धा सहभागी झाले होते. या उपक्रमामुळे गांवातील लोकांना सामुदायिक पार्थना व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या उच्च विचारांची देवाण घेवाण होईल व एक समृद्ध गांव म्हणून प्रगतीकडे वाटचाल करता येईल असे प्रतिपादन गावकरी यांनी केलेत .
COMMENTS