फ्रीशीप पोर्टलवरील तृटीची तातडीने सुधारणा करून एम.बी.बी.एस. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मार्ग खुले करावेत. -डॉ. राजेंद्र गवई

HomeNewsनागपुर डिवीजन

फ्रीशीप पोर्टलवरील तृटीची तातडीने सुधारणा करून एम.बी.बी.एस. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मार्ग खुले करावेत. -डॉ. राजेंद्र गवई

गौतम नगरी चौफेर (अशोककुमार उमरे ) – फ्रीशीप पोर्टलवरील तृटीमुळे वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांस शैक्षणिक सवलतीपासून वंचित राहावे लागत असल्याने राज्याचे मुख्यमंत्री मा. नाम. देवेंद्रजी फडणवीस यांनी तातडीने लक्ष देऊन सुधारणा करण्याबाबतचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी केले.

राजुरा विधानसभा मतदारसंघातील सार्थक सर्वानंद वाघमारे रा. बामणवाडा पोस्ट चुनाळा ता. राजुरा जिल्हा चंद्रपूर या विद्यार्थ्यांना सन २०२४- २५ मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार येथे M.B.B.S. अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेला आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे सदर विद्यार्थ्यांनी यापूर्वी २९२३- २४ मध्ये शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, नागपूर येथे B.A.M.S. कोर्ससाठी प्रवेश घेतलेला होता. मात्र NEFT द्वारे M.B.B.S. प्रवेश मिळाल्यानंतर त्यांने B.A.M.S. कोर्स सोडून शासनास चार वर्षांची ट्युशन फी व फ्रीशीपची एकूण रुपये ३,००,०००/- रक्कम चलनाद्वारे परत केली आहे.

तरीही सध्य:स्थितीत समाज कल्याण पोर्टलवर अशा विद्यार्थ्यांसाठी कोणताही पर्याय उपलब्ध नसल्यामुळे M.B.B.S. अभ्यासक्रमासाठी फ्रीशीप अर्ज अपलोड करता येत नाही. परिणामी सदर विद्यार्थी शैक्षणिक सवलतीपासून वंचित राहत असून त्यांच्या पालकांना लाखोंची ट्युशन फी भरावी लागत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून असून गरजूंना न्याय मिळण्यासाठी सदर प्रणालीतील तात्काळ सुधारणा करून विद्यार्थ्यांसाठी फ्रीशीप अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून सहकार्य करावे असे आवाहन रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ राजेंद्र गवई यांनी केले

COMMENTS

You cannot copy content of this page