आदर्श शिक्षकांचा जन्मभूमी व कर्मभूमीत सत्कार

HomeNewsनागपुर डिवीजन

आदर्श शिक्षकांचा जन्मभूमी व कर्मभूमीत सत्कार

गौतम नगरी चौफेर  कोरपना : तालुक्यातील पिंपळगाव येथील मित्र परिवाराने   आदर्श शिक्षकांसाठी सत्कार सोहळा आयोजित केला. या सोहळ्यात गावातील दोन शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याने गावकऱ्यांच्या वतीने गौरव करण्यात आला. सत्कारमूर्तींमध्ये मंगेश बोढाले यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात त्यांनी राबविलेल्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून त्यांना जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाला आहे. पिंपळगाव ही मंगेश बोढाले यांची ही जन्मभूमी आहे.

याच सोहळ्यात अशोक गोरे यांचाही सत्कार करण्यात आला. आपल्या दीर्घ सेवेत त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले. निवृत्तीनंतरही ते सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. त्यांची ही कर्मभूमी आहे. या कार्यक्रमात गावातील मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी शिक्षकांचे योगदान अधोरेखित करताना “शिक्षक हे समाजाचे दीपस्तंभ आहेत,” असे प्रतिपादन केले. यावेळी बोढाले व गोरे यांनी आपल्या भावना व्यक्त करत उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हभप खुशाल गोहोकर यांनी केले, संचालन रमेश लोणबले यांनी तर आभार प्रदर्शन बंडू बोढाले यांनी केले. सत्कार सोहळ्यामुळे गावात सांस्कृतिक व शैक्षणिक वातावरणाचा उत्साह निर्माण झाला.

COMMENTS

You cannot copy content of this page