निवडणूक प्रचारातही हा माणूस सामाजिक बांधिलकी सोडत नाही

HomeNewsनागपुर डिवीजन

निवडणूक प्रचारातही हा माणूस सामाजिक बांधिलकी सोडत नाही

एका फोन वर प्रचार सोडून पोहोचला दवाखान्यात

गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी गडचांदूर (दि. ०४ नोव्हेंबर २०२४) –
निवडणुकीच्या या धामधुमीत प्रत्येक उमेदवार हा मतांची जुडवनी करण्याकरिता लोकांच्या जनसंपर्कात असतो. गठ्ठा मते कसे मिळतील याकडे लक्ष केंद्रित करतो. प्रचाराकरिता दाही दिशा कार्यकर्त्यांसोबत फिरताना सातत्याने जनसंपर्कात राहून कमी वेळात कश्या प्रकारे जास्तीत जास्त मतदारांचा भेटी घेता येईल याकडे लक्ष केंद्रित ठेवत असतो. मात्र संभाजी ब्रिगेडचे उमेदवार सामाजिक कार्यकर्ते भूषण मधुकरराव फुसे हे अश्या प्रस्थापित नेत्यांपेक्षा वेगळे असून नेतेगिरी नंतर अगोदर सर्वसामान्य लोकांचे दैनंदिनी प्रश्न सोडविले गेले पाहिजे अश्या विचारांचे असून तसे त्यांच्या कृतीतून नुकतेच दिसून सुद्धा आले आहे. निवडणुकीचा कामात व्यस्त असताना एक फोन येतो आणि सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे हे लगेच गडचांदूर गाठत दवाखान्यात पोहोचतात. सविस्तर वृत्त असे कि जिवती तालुक्यातील गणेरी येथील एका इसमाचा फोन येतो कि त्याचा १६ महिन्याचा मुलगा मागील चार दिवसापासून गडचांदूरातील सरकारी दवाखान्यात भरती आहे. डॉक्टर योग्य उपचार करत आहे कि नाही बघा. सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी दवाखाना गाठत रुग्णाच्या आई वडिलांची विचारपूस केली. १६ महिन्याच्या रुग्णाचा वडिलांनी रडत रडत सांगितले कि मागील चार दिवसापासून त्यांच्या मुलगा बिमार आहे. दिवसभर जिवतीत जाऊन काम करावे लागते व रात्री दवाखाण्यात येऊन जागरण करावे लागत आहे. भूषण फुसे यांनी डॉक्टरांची भेट घेत उपचार कसा सुरू आहे याबाबत विचारणा केली.

एकीकडे आजी माजी लोकप्रतिनिधी निवडणुकीचा काळात त्यांनी त्यांच्या काळात केलेल्या विकासकामांची प्रसिद्धी करीत आहे मात्र वास्तविक पाहता प्रस्थापित आजी माजी लोकप्रतिनिधीनी स्वतःचा कुटुंबीयांचा आणि जवळच्या कार्यकर्त्यांच्या विकास करण्याव्यतिरिक्त लोकांच्या कामाचे विकास करण्यात कुचकामी ठरले आहे. जिवती तालुक्यात सरकारी दवाखाना नसल्याने उपचाराकरिता गडचांदूर गाठावे लागत आहे, म्हणून काबाडकष्ट करणाऱ्यांना आप्तेष्ट बिमार पडल्यास दिवसभर काम करून दुसऱ्या गावी जाऊन दवाखान्यात उपचार करून घ्यावा लागत आहे. तालुक्याचे ठिकाण असलेल्या जिवती व कोरपना तालुक्यात तसे औद्योगिक नगरी गडचांदूरात आजी माजी लोकप्रतिनिधी साधं बस स्थानक स्थानक देऊ शकले नाही. गोंडपिपरीत एमआयडीसीला जागा असून सुद्धा तिथे वीज, पाणी आणि इतर सोयी सुविधा देऊ कले नाही व हे स्वतःला विकास पुरुष म्हणवून घेत आहे. म्हणून नागरिकांवर अशी वेळ आली असून आता तरी नागरिकांनी डोळे उघडून जे सामाजिक कार्यकर्ते रात्रं दिवस लोकांच्या सेवेत असतात अश्याना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून द्यावे से आवाहन केले.

COMMENTS