पुस्तके दान करून साजरी केली क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती.

HomeNewsनागपुर डिवीजन

पुस्तके दान करून साजरी केली क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती.

– उडान – सहयोग हुमन फाउंडेशनचा अभिनव उपक्रम.

गौतम नगरी चौफेर सौ सुवर्णा बादल बेले राजुरा – ४ जानेवारी शिक्षणाची ज्योत पेटविणाऱ्या, स्त्रियांना शिक्षणाची दार खुली करून देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त उडान – सहयोग हुमन फाउंडेशन यांच्या वतीने राजुरा येथील जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय येथे बँकिंग, रेल्वे भरती, पोलिस भरती व अन्य स्पर्धा परीक्षा पुस्तके दान करून सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी  सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी चे  सहाय्यक जिल्हा अधीक्षक चंद्रपूर श्री वैभव ढोबळे, शाखा व्यवस्थापक रोशन रासेकर, सह शाखा व्यवस्थापक कपिल इटनकर, उडान टीम लीडर ज्योती वेलादी,गट विकास अधिकारी अमर कोसरे, मधुकर डांगे, अध्यक्ष जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय, लक्ष्मण घुगुल सदस्य , तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. संविधान वाचन विक्रांत मुन यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक वामन साळवे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता उडान -सहयोग हुमन फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. यापूर्वी *सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी,राजुरा शाखे* तर्फे सामाजिक बांधिलकी जपत शालेय विद्यार्थ्यांना कपडे वितरण, शैक्षणिक साहित्य भेट व समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले असून पुस्तकं दान करून खऱ्या अर्थाने सहयोग ने सावित्रीबाईंच्या कार्याला, विचारांचा वारसा पुढे नेण्यास हातभार लावला आहे.

COMMENTS

You cannot copy content of this page