राष्ट्रसंतांच्या नामस्मरणाने दुमदुमली नांदा नगरी

HomeNewsनागपुर डिवीजन

राष्ट्रसंतांच्या नामस्मरणाने दुमदुमली नांदा नगरी

पदावली भारुड भजन शोभायात्रेने वेधले लक्ष

गौतम नगरी चौफेर(नांदा) – कोरपना तालुक्यातील नांदा नगरीमध्ये मागील अनेक वर्षापासून सुरू असलेला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती गाडगे महाराज स्मृतिदिन दि. १६, १७ व १८ जानेवारी २०२६ रोजी पार पडला. यानिमित्ताने गावात मागील १० ते १२ दिवसांपासून युवकांच्या माध्यमातून ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ज्यामध्ये गावातील रस्त्यावर पडलेली घाण साफ करणे, औद्योगिक चौकाचे सुशोभीकरण, भिंतीवर अनेक घोषवाक्य व स्वच्छतेविषयक सुविचार, सांडपाण्याची व्यवस्था अबाधित राखणे, आरोग्य शिबिर आदी विविध राबविण्यात आले. शेवटच्या दिवशी निघालेल्या शोभायात्रेत ३४ पदावली भारुड भजन मंडळ सहभागी झाले होते. या शोभायात्रेत विविध देखावे सादर करण्यात आले.

रात्रौ संत निर्मला देवी यांच्या अनुयायांच्या माध्यमातून सहज योगाचा कुंडलिनी कार्यक्रम घेण्यात आला. ग्रामगीताचार्य श्रीनिवासजी खाडे (बेला ) यांचे मार्गदर्शन, ह.भ.प. शरद महाराज वैद्य यांचे प्रबोधन पर किर्तन झाले. ज्यामध्ये हजारो नागरिकांनी सहभाग नोंदविला. स्मृतिदिनाचे औचित्य साधत पुरुष, महिला व बाल या तीनही गटांमध्ये विदर्भस्तरीय भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये नांदेड, हिंगोली, अमरावती, शेगाव, नागपूर, वर्धा, गडचिरोली, यवतमाळ, आदिलाबाद, सिरोंचा आदी ठिकाणाहून आलेल्या भजन मंडळींनी सहभाग नोंदविला.

तीनदिवसीय भजन स्पर्धेमध्ये बाल गटातून प्रथम पारितोषिक जय गुरुदेव भजन मंडळ भेंडाळा, दुसरे पारितोषिक महाराणा भजन मंडळ निमकोरळा, तिसरे पारितोषिक बाल भजन मंडळ शेणगाव, चौथे पारितोषिक श्री गुरुदेव भजन मंडळ रामपूर यांनी पटकावले. तर महिला गटात प्रथम पारितोषिक संतकृपा महिला भजन मंडळ इंदिरानगर चंद्रपूर, दुसरे पारितोषिक गुरुमाऊली महिला भजन मंडळ काटोल नागपूर, तिसरे पारितोषिक अप्पास्वामी महिला भजन मंडळ शेगाव, चौथे पारितोषिक ओम जयभारती महिला भजन मंडळ दक्षिण नागपूर यांनी पटकावले. पुरुष गटामध्ये आदर्श गुरुदेव सेवा भजन मंडळ निमगव्हाण, सामर्थक भजन मंडळ हस्तापूर, स्वर गुरुकुंजाचे भजन मंडळ मोझरी, राष्ट्रसंत भजन मंडळ जुनोना यांनी अनुक्रम प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांक पटकावला.

कार्यक्रमाचा शेवट काल्याचे कीर्तन ह.भ.प.कु. साक्षी महाराज अतकारे व महाप्रसाद वितरणाने झाला. यशस्वीतेसाठी श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ, नांदा श्रमसंस्कार शिबिराचे कार्यकर्ते व गावातील नवयुवकांनी सहकार्य केले.

COMMENTS

You cannot copy content of this page