गौतम नगरी चौफेर (वणी) – वणी उमेश बेसरकर आपल्या शांत, मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांच्या मनात स्थान मिळवू शकले. त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ते सदैव सक्त आणि तत्पर होते. आज तारीख २३ रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास त्यांच्या छातीत दाटून आले आणि त्यांना वणी येथे लोढा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
त्यांच्या निधनामुळे मारेगावसह यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी त्यांच्या कुटुंबियांचे दुःखात सहभागी होत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उमेश बेसरकर यांच्या पश्चात पत्नी , दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या अकस्मात मृत्यू मुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



COMMENTS