गौतम नगरी चौफेर प्रतिनिधी – कृष्णा चव्हाण.
जिवती – नुकताच बळीराजाचा मोठा सण बैल पोळा साजरा झाला. हा सण शेतकरी मोठ्या उत्साहाने साजरा करतात.त्यात बैलांना सजविले जाते. या सणाला सर्व शेतकरी एकत्र येऊन बैल पोळा भरविरता.त्यात प्रत्येक शेतकरी आपली बैल जोडी कशी उठून दिसेल यासाठी वेगवेगळी सजावट करतो मात्र जिवती तालुक्यातील गुडसेला गावातील युवा शेतकरी प्रशांत माधव मोरे यांनी आपल्या बैलांची सजावट ही अनोखी केल्याने त्या बैल जोडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांनी बैलांच्या पाठीवरील झुलिवर स्वच्छ्ता, आरोग्य, स्त्री पुरुष समानता, सेंद्रिय शेती चे महत्व, शेती विषयीचे तंत्रज्ञान, बेटी बचाव बेटी पाठव, पर्यावरण संवर्धन आदी विषयावर सुविचार लिहिले
होते. त्यामुळे बैल पोळा पाहायला आलेल्या प्रत्येक व्यक्ती चे लक्ष त्या बैल जोडीने वेधून घेतले होते.


COMMENTS