गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, ता.प्र. –
राजुरा शहरातील एक अनोळखी पुरूष वय, अंदाजे 40 ते 45 वर्ष जिल्हा परिषद शाळेसमोरील माणुसकीची भिंत या ठीकाणी मृतावस्थेत सापडला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करून प्रेत ताब्यात घेतले आणि राजुरा पोलिस ठाण्यात मर्ग दाखल केला.
सदर इसम लांबट चेह-याचा, सावळ्या रंगाचा व अंगात लालसर रंगाची टी शर्ट घालून होता. त्याचे केस वाढलेले व काळी पांढरी वाढलेली दाढी होती. वरील वर्णनाच्या पुरूषाबाबत माहिती मिळाल्यास अथवा नातेवाईकांची माहिती मिळाल्यास संपर्क क्रमांक ०७१७३-२२२१२८ यावर माहिती द्यावी, असे आवाहन चौकशी अंमलदार अवधेश सिंग, बंडू राठोड पो.ह. राजेंद्र जुमनाके यांनी केले आहे.
COMMENTS