गौतम नगरी चौफेर (प्रतिनिधी, खुशाल जाधव,यवतमाळ जिल्हा) आर्णी: पंचायत समिती मध्ये तांत्रिक सहाय्यक या पदावर कार्यरत असलेले सुधाकर राठोड या अधिकाऱ्याने शेतकऱ्यांना ना त्रास देत आहे असल्याचे निवेदनातून समोर आले आहे जिओ ट्रेकिंग च्या नावाखाली वैयक्तिक सिंचन विहीर बिल बांबू लागवड व इतर शेती विषयक बिले काढण्याच्या नावाखाली लाभार्थी शेतकऱ्यांकडून पैसे उकळतात शेतकऱ्यांना लुटण्याचा प्रकारातून त्यांनी लाखो रुपयांची माया जमा केली असे बोलल्या जात आहे ज्या शेतकऱ्यांकडून पैशाची पूर्तता होत नसेल त्यांना आडवा उडवी ची उत्तरे देऊन त्यांच्या कामावर दिरंगाई करतात त्यांच्या या कार्यशैलीमुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाले आहेत हा प्रकार सर्रास घडत आहे काही अधिकाऱ्यांना या प्रकाराविषयी माहितीअसून सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे वरिष्ठअधिकाऱ्याने या विषयाची सखोल चौकशी करून या लाचखोर तांत्रिक सहायकावर कारवाई करून निलंबित करण्यात यावे असे निवेदन दिनेश जाधव कृष्णनगर यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती आर्णी यांना दिले आहे
COMMENTS