बिबी येथील शिबीरात १०८ रुग्णांची कॅन्सर व आरोग्य तपासणी

HomeNewsनागपुर डिवीजन

बिबी येथील शिबीरात १०८ रुग्णांची कॅन्सर व आरोग्य तपासणी

गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी कोरपना) – जिल्हा स्मार्ट ग्रामपंचायत, बिबी व आरोग्य उपकेंद्र, बिबी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी ग्रामपंचायत सभागृहात कॅन्सर व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन पार पडले. शिबीरात १०८ रुग्णांची कॅन्सर व आरोग्य तपासणी करण्यात आली.
        टाटा ट्रस्ट चंद्रपूरच्या वतीने गावातील ३० वर्षावरील लोकांचे बी.पी., शुगर, स्तनाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर यांची तपासणी व उपचार करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन सरपंच माधुरी टेकाम यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपसरपंच आशिष देरकर, डॉ. सुशील चंदनखेडे, आरोग्य सेविका शालूनंदा खोब्रागडे, लिपिका दास, आशा गटप्रवर्तक फरझाना शेख आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेकरिता आशा कार्यकर्ती सखू खोके, विजया मिलमीले, सुवर्णा उपलेटी, कल्पना ठाकरे, सुवर्णा लोडे, लता गेडाम, सुमन गेडाम, ज्योती काटे, प्रतिभा मुळे, चैताली नरसपुरे, बबीता कांबळे तसेच टाटा ट्रस्टच्या सर्व डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

COMMENTS