मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज …स्ट्रॉग रूमवर कडेकोट बंदोबस्त

HomeNewsनागपुर डिवीजन

मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज …स्ट्रॉग रूमवर कडेकोट बंदोबस्त

गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) दि.22 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करीता जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी शांततेत मतदान झाले. जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघातील 50 उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले. या मतपेट्या तीनही विधानसभा मतदारसंघातील स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. स्ट्राँग रुममधील मतपेटींच्या देखरेखीसाठी पोलीस यंत्रणेचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.      
         भंडारा जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर शनिवार 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8.00 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 60-तुमसर साठी मतमोजणी  तहसील कार्यालय तुमसर येथे 61-भंडारासाठी पेालीस बहुददेशीय सभागृहात 62 साकोलीत उपविभागीय कार्यालय,गड कुंबली रोड येथे मतमोजणी होणार आहे. 62-साकोली येथे मतमोजणीसाठी  24 टेबलवर 81 मतमोजणी पर्यवेक्षक,मतमोजणी सहायक ,सुक्ष्म निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहे. राखीव कर्मचारी 20 असतील .तर 61भंडारा येथे मतमोजणीसाठी 24 टेबलवर 89  मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक , सुक्ष्म निरीक्षक  काम करतील. राखीव कर्मचारी 20 असतील.एकुण 109 अधिकारी कर्मचारी मतमोजणी करतील.60 -तुमसर येथे मतमोजणीसाठी  24 टेबलवर 81 मतमोजणी पर्यवेक्षक,मतमोजणी सहायक ,सुक्ष्म निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहे..राखीव कर्मचारी 20 असतील .एकुण 101 कर्मचारी मतमोजणी करतील.

COMMENTS